इंग्रजी शाळेत आपला मुलगा शिकावा, यासाठी आई आणि वडील दोघांनी प्रयत्न केले. अखेर पाली येथील परिवर्तन इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला. फी भरली दीड महिना शाळेने शिकवले. मात्र अचानक तुमच्या मुलाला शाळेत पाठवू नका, असे शाळेने संगितल्याचा आरोप पीडित आईने केला आहे. विशेष म्हणजे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आपल्या मुलाला पाठवता आलं नाही याची खंत देखील बोलून दाखवली.
एचआयव्हीबाधित आई-वडिलांच्या समाजाकडून मुलाला दिली गेलेली वागणूक हिणकस आहे. पाच वर्षाच्या मुलाचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेतला जातो हे दुर्दैव आहे, असं मत इन्फट इंडिया प्रकल्पाचे संचालक दत्ता बारजगे यांनी व्यक्त केले.
यासंदर्भात परिवर्तन प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या संचालक आणि शिक्षकांना विचारणा केली असता आम्ही मुलाला कोणतीही हीन वागणूक दिली नाही. याचे फोटो विडिओ आमच्याकडे आहेत. मात्र इतर पालक आक्रमक झाले. तो मुलगा शाळेत येणार असेल तर आमची मुलं पाठवणार नाहीत, असा पवित्रा इतर पालकांनी घेतला. म्हणून शासन आणि प्रशासनाने मदत करावी मागणी शाळेचे संचालक अशोक शिंदे यांनी केली.
घडलेल्या प्रकारा संदर्भात बीडचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांना विचारले असता प्री प्रायमरी स्कूल ही खाजगी आहे. त्याला कुठलीही मान्यता दिली जात नाही. सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांना आम्ही सूचना दिली असून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
गावातील पालक भीतीपोटी मुलांना शाळेत पाठवत नाहीत. म्हणून संस्थाचालक देखील अडचणीत आहेत. तर मुलाला शिक्षण मिळावं म्हणून एचआयव्ही बाधित पालक देखील आग्रही आहेत. या वादात एचआयव्ही संदर्भात कोट्यवधी रुपये खर्च करून आरोग्य विभाग कागदोपत्री जनजागृती करत आहे. मात्र, प्रत्यक्ष लोकांचे गैरसमज दूर झाले नाहीत. म्हणून जनजागृती कमी पडत असल्याच यावरून दिसून येत आहे.
मात्र एचआयव्ही बाधित असलेल्या पालकांच्या मुलांना तेही एच आय व्ही निगेटिव्ह असताना शिकण्याचा अधिकार नाही का? आणि जर असेल तर इतर शाळेत त्यांना इतर मुलांचे पालक स्वीकारतील का याच सगळ्या घडामोडी सिद्ध करणारी ही पाली येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचं पाहायला मिळ आहे. आता नेमके यावर शासन-प्रशासन कशा पद्धतीने त्याच्याशी निगडीत असलेल्या विद्यार्थ्यांना आणि एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेल्या पालकांना न्याय देते हेच आता पाहणे गरजेचे आहे