ऑनलाईन गेम खेळता खेळता मुलगा, मुलगी एकमेकांच्या संपर्कात आले. दोघांची मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न केलं. आता लग्नाला महिना झाला आहे. दोघांचा संसार अगदी आनंदात सुरू आहे.

मध्य प्रदेशातील रायसेन शहरातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये वास्तव्यास असलेला तरुण दीड वर्षांपूर्वी पबजी खेळता खेळता उत्तराखंडच्या नैनीतालमध्ये राहणाऱ्या शीतलच्या संपर्कात आला. दोघांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. व्हॉट्स चॅटपासून सुरू झालेलं संभाषण व्हिडीओ कॉलपर्यंत पोहोचलं. लग्नाआधी दोघे एकदाच भेटले होते. महिन्याभरापूर्वी त्यांनी भोपाळमध्ये लग्न केलं आणि सोबत राहू लागले.
नैनितालमध्ये बीएससीचा अभ्यास करताना शीतलला पबजी खेळण्याची सवय लागली. गेम खेळता खेळता ती योगेशच्या संपर्कात आली. दोन वर्षे दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर शीतल नैनितालहून पळून रायसेनला आली आणि दोघांनी लग्न केलं. कुटुंबियांच्या तक्रारीवरून नैनिताल पोलीस शीतलला नेण्यासाठी आले. मात्र तिनं स्वत:च्या मर्जीनं लग्न केलं असल्यानं, ती सज्ञान असल्यानं पोलिसांना तिच्याशिवाय परतावं लागलं.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.