Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Aug 24, 2022, 10:27 PM

Crime News : पुणे जिल्ह्यातील बारामतीत व्याजाने घेतलेल्या पैशाला कंटाळून इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तिघांवर महाराष्ट्र सावकारी अधिनियमान्वये वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Pune Baramati news

हायलाइट्स:

  • सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाची आत्महत्या
  • तिघांवर महाराष्ट्र सावकारी अधिनियमान्वये गुन्हा दाखल
  • पुण्यातील बारामतीतील इंदापूर तालुक्यातील घटना
पुणे : जिल्ह्यातील बारामतीत व्याजाने घेतलेल्या पैशाला कंटाळून इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जावेद अब्बास मुलाणी असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी नवाज अब्बास मुलाणी (वय ४०) वर्ष रा.भरणेवाडी ता इंदापुर यांच्या फिर्यादीवरून प्रफुल्ल रघुनाथ देवकाते रा.पिंपळी ता.बारामती जि पुणे, विजय मोटे रा .निरावागज ता. बारामती जि. पुणे, संदिप अरुण भोसले रा.निमसाखर ता. इंदापुर यांच्यावर महाराष्ट्र सावकारी अधिनियमान्वये वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जावेद अब्बास मुलाणी यांनी प्रफुल्ल देवकाते, विजय मोटे, संदीप भोसले यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. या व्याजाच्या पैशावरून वरील तिघांकडून जावेद मुलानी यास सतत त्रास देऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

माणुसकीला काळीमा; आई-वडील एचआयव्ही बाधित, मुलाला इंग्रजी शाळेत प्रवेशच नाकारला
जावेद मुलानी यांनी काल २३ ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील जंक्शन गावच्या हद्दीतील जंक्शन कळस रोड येथील एका शेतकऱ्याच्या विहिरी शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये अँगलला गळफास घेतला. व्याजाच्या पैशावरून वरील तिघे जीवे मारण्याची धमकी देऊन सतत त्रास देत असल्याची चिठ्ठी मयताच्या खिशात आढळून आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोसई खंदारे करीत आहेत.

फडणवीस शिंदेंचं विशेष लक्ष, कोल्हापूर जिल्ह्याला लॉटरी? १२ आमदारांच्या यादीत ३ नावे चर्चेत

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here