औरंगाबाद : विद्यापीठात आलेल्या तीन तरुणांनी मोपेड वाहन हिसकावून हुल्लडबाजी करत तरुणीची छेड काढली, तसेच तरुणींना मारहाण देखील केली. हे कमी होते की काय, पण एवढ्यावरच न थांबता या तरुणींच्या बचावासाठी आलेल्या एका पोलिसाला देखील बेदम मारहाण करून आरोपीनी पोलिसाच्या डोक्यात दगड घातला होता. या प्रकरणाने औरंगाबादमध्ये खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींचा शोध घेत दोघांच्या मुसक्या आवळल्या असून एक जण फरार आहे. या प्रकरणात संदीप ज्योतीराम चव्हाण, (वय – ३२ वर्षे, राहणार-गांधीनगर, औरंगाबाद), विकी नरसिंह रिडलोन (वय- ३२ वर्षे, राहणार हनुमान मंदिरजवळ, गांधीनगर, औरंगाबाद) यांना अटक करण्यात आली आहे. तर हरीश चौधरी, (रा.बापूनगर,औरंगाबाद) हा तिसरा आरोपी फरार आहे. (police nabbed the accused who molested the girls and attacked the police)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मोपेड दुचाकीवरून तीन तरुणी आल्या होत्या. आरोपीनी त्यांचा पाठलाग केला व गोगाबाबा टेकडी परिसरात असलेल्या अंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाजवळ या तरुणींची छेड काढली. तसेच त्यांना मारहाण देखील केली. दरम्यान, तेथून पोलीस कर्मचारी सचिन म्हस्के हे जात असल्याचे पाहून भेदरलेल्या तरुणींनी म्हस्के यांना घडलेला प्रकारा सांगितला.

हात-पाय बांधलेले, दात पडलेले, कमरेला फास; बेपत्ता तरुणाचा मृतदेह घराजवळच्या विहिरीत सापडला
दरम्यान तेथे तिन्ही आरोपी आले व बचावा साठी समोर आलेल्या कर्मचारी म्हस्के यांना तिघांनी बेदम मारहाण केली. यावेळी त्यांनी त्यांच्या डोक्यात दगड घातला व पसार झाले होते. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुन्हा व्हिडिओ टाकला तर चेहरा खराब करू; इंस्टाग्रामवर Reels टाकणाऱ्या तरुणाला मारहाण
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. या दरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची कसून तपासणी केली. त्यात आरोपी दुचाकीवरून जात असल्याचे समोर आले. मात्र ते स्पष्टपणे दिसत नव्हते. पोलिसांनी ते अंधूक फोटो डेव्हलप करीत आरोपींचा शोध घेतला. त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली असून एका आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

तरुणीच्या हत्येप्रकरणी तिसऱ्या आरोपीच्या अटकेनंतर पुन्हा धक्कादायक माहिती उघड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here