दापोली : माजी परिवहन मंत्री व तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्यावर आरोप असलेल्या मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी केंद्राच्या तज्ञ समितीचे हे रिसॉर्टवर कारवाई करून तोडण्याची शिफारस केल्याने खळबळ उडाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केल्याने बहुचर्चित असलेल्या व सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या साई रिसॉर्टवर आता कारवाई करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तुटला, आता नंबर अनिल परब यांचा. त्यांचे साई रिसॉर्ट पडणार, असे सोमय्या यांनी सोमवारी रात्री उशिरा ट्वीट केले आहे. या सोबत त्यांनी २२ ऑगस्ट रोजी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून आलेले पत्रही ट्विट केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या कथित प्रकरणी अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्याचे कोस्टल झोन एथॉर्टी सेक्रेटरी व प्रदूषण नियंत्रण मंडळाला हे पत्र देण्यात आले आहे. (The Central Committee has ordered the demolition of the Sai Resort at Murud)

मेसर्स साई रिसॉर्ट्स एनएक्स आणि मेसर्स सी द्वारे सर्व्हे नंबर ४४६, गाव मुरुड, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र येथे सीआरझेड क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम शंख रिसॉर्ट केंद्र शासनाने नेमलेल्या तज्ञ समितीचे निष्कर्ष व शिफारशी केल्या आहेत.

अशा आहेत शिफारशी-

निष्कर्ष आणि शिफारसी समितीला असे वाटले की साइटवर झालेले नुकसान हे सीआरझेड अधिसूचना, २०११ च्या तरतुदींच्या विरुद्ध सीआरझेडच्या एनडीझेडमधील बांधकाम इमारतींचे आहे. त्यामुळे त्यामधील अनधिकृत बांधकामे हटवणे ही उपाययोजना करणे आवश्यक आहे. NDZ क्षेत्रातून संपूर्णपणे आणि क्षेत्र त्याच्या मूळ स्थितीत पुनर्संचयित करा अशी स्पष्ट सूचना या समितीने केल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; प्रशासनाचा मोठा निर्णय
बांधकाम आणि विध्वंस कचरा व्यवस्थापन नियमांसह प्रचलित तरतुदींनुसार, विध्वंसातून निर्माण होणारी संभाव्य मोडतोड आणि इतर साहित्य योग्यरित्या गोळा करणे आणि पुनर्प्रक्रिया/पुनर्वापरासाठी किंवा स्थानिक सक्षम प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीने विल्हेवाटीसाठी सुरक्षितपणे वाहतूक करणे आवश्यक आहे. आवश्यक असल्यास, विध्वंस करण्यापूर्वी तज्ञांचे मत घेतले पाहिजे आणि सक्षम प्राधिकारी/तज्ञ संस्थेच्या देखरेखीसह पाडाव्यात. आजूबाजूच्या वातावरणाच्या अनुषंगाने वृक्षारोपण / क्षेत्र विकसित करणे आवश्यक आहे.

https://maharashtratimes.com/maharashtra/ratnagiri/the-konkan-railway-administration-has-decided-to-increase-the-number-of-coaches-for-those-going-to-konkan-for-ganeshotsav/articleshow/93736427.cms

समितीने CRZ चे उल्लंघन केल्याबद्दल पर्यावरणीय भरपाई दंड म्हणून मेसर्स सागरी शंख रिसॉर्टसाठी ३७,९१,२५० रुपये आणि मेसर्स साई रिसॉर्ट्ससाठी २५,२७,५०० इतक्या रक्कमेची शिफारस केली आहे. अधिसूचना, २०११ प्रदूषक वेतन तत्त्वाखाली प्रकल्प प्राधिकरणाच्या विध्वंसासाठी लागणारा खर्च, C&D कचऱ्याची विध्वंस, वाहतूक आणि विल्हेवाट लावणे यासह क्षेत्र पुनर्संचयित करणे / आसपासच्या पर्यावरणाच्या अनुषंगाने क्षेत्र विकसित करणे यासाठी लागणारा खर्च सक्षम प्राधिकारी/तज्ञ संस्थेमार्फत स्वतंत्रपणे मोजला जाईल, असेही या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

पायवाटेवर दिसला मृतदेह; कारण आणि खुनी कोण, हे समजल्यावर ग्रामस्थांना बसला मोठा धक्का

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here