car accident news, भीषण! बोलेरोच्या धडकेत ब्रेजा कारचा चक्काचूर; एका महिलेचा जागीच मृत्यू, २ गंभीर जखमी – brezza car accident with bolero one woman died on the spot 2 seriously injured
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेले अपघाताचे सत्र कायम असून हिंगोली-औंढा नागनाथ मार्गावर लिंबाळा गावाजवळ पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. दोन वाहनांच्या धडकेमुळे झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली असून अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री ८ वाजता घडली आहे. शोभा दरक (४५, रा.नांदेड) असं मृत महिलेचं नाव असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड येथील काहीजण त्यांच्या कारने (एमएच २६-एआर-७०२०) हिंगोली येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. हिंगोलीतील कार्यक्रम आटोपून रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ते परत नांदेडकडे निघाले. मात्र त्यांची कार हिंगोली ते औंढा मार्गावर लिंबाळा पाटीजवळ आली असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या दुसऱ्या कारने (एमएच ३८-८०७३) त्यांच्या कारला धडक दिली. संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्यावर गुन्हा; सोमय्यांनी केली होती तक्रार
या अपघातामध्ये कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला. तसंच कारमधील शोभा दरक व अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने हिंगोली येथील लक्ष्मी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रस्त्यामध्येच शोभा दरक यांनी प्राण सोडले, तर अन्य दोन जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लक्ष्मी हॉस्पिटलचे डॉ.अखिल अग्रवाल, डॉ. संदीप इंगळे, डॉ. मंगेश मुंडे, डॉ. पंजाब शेळके, डॉ. प्राची अग्रवाल, डॉ. मयूर अग्रवाल यांच्या पथकाने गंभीर जखमी झालेल्या दोन्ही महिलांवर उपचार सुरू केले आहेत. त्यापैकी एका महिलेवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलवले आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक आर. एन. मळघने, जमादार संतोष वाठोरे यांच्या पथकाने भेट दिली आहे.