नांदेड : नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भोकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्रीनिवास ऊर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचं निधन झालं आहे. अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना बुधवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७८ वर्षांचे होते.

बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या निधनाने भोकर विधानसभा मतदारसंघात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता गोरठा, ता.उमरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

भीषण! बोलेरोच्या धडकेत ब्रेजा कारचा चक्काचूर; एका महिलेचा जागीच मृत्यू, २ गंभीर जखमी

बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी भोकर विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे मतदारसंघात त्यांचा चांगलाच प्रभाव होता. तसंच कार्यकर्त्यांचं मोठे जाळंही त्यांनी विणलं होतं. त्यांच्या जाण्याने तालुक्यासह जिल्ह्याचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. उमरी तालुक्यातील मूळ गावी गोरठा येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता गोरठेकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अनिल परब यांना एसटी महामंडळाचा धक्का; डिजिटल तिकिटांबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

बापूसाहेब गोरठेकर यांची राजकीय कारकीर्द

बापूसाहेब गोरठेकर यांचे वडील दिवंगत बाबासाहेब गोरठेकर हेदेखील राष्ट्रवादीशी एकनिष्ठ होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत बापूसाहेब यांनीही राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला. गोरठेकर यांनी एकदा नायगाव विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र तिथे त्यांचा अपक्ष उमेदवाराकडून पराभव झाला. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र तेथे ते फार काळ रमले नाहीत आणि पुन्हा आपल्या मूळ पक्षात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी केली. बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत असून उमरी, भोकर तालुक्यासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here