वर्धा : मुक्या जनावरांप्रति सर्वांनाच प्रेम असतं. मात्र, मानवतेला काळीमा फासणारी अशी एक घटना देवळी शहरात रविवारी २१ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेचे सीसीटीव्ही आज समोर आल्याने खळबळ उडाली आहे. देवळी शहराच्या मुख्य चौक समजल्या जाणाऱ्या ठाकरे चौकात मध्यरात्री ११.१५ वाजताच्या सुमारास एका माथेफिरूने चक्क गर्भवती श्वानाच्या पोटात चाकू भोसकून निर्दयीपणे हत्या केली. या घटनेने दोन दिवस उलटूनही एकाही प्राणी मित्र किंवा संघटनांनी दखल न घेणे ही शोकांतिकाच म्हणावी लागले.

या क्रुरतेमुळे समाजमनही सुन्न पडले आहे. या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी वर्धेच्या युवा परिवर्तन आवाज संघटनेने केली आहे. २१ ऑगस्ट रोजी रविवारच्या रात्री ११ वाजून १९ मिनिटांनी लाल शर्ट घातलेला अज्ञात माथेफिरु ठाकरे चौकात आला. त्याच्या हातात चाकू होता. तो जोरजोरात ओरडत होता. त्याने रस्त्याकडेला झोपून असलेल्या गर्भवती श्वानाच्या पोटात चाकूने सपासप वार करून श्वानाची निर्दयीपणे हत्या केली.

वर्ध्यात खळबळ! शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण; नंतर धावत्या कारमध्येच बलात्कार
प्रत्यक्षदर्शी असलेल्या नागरिकांनी त्या माथेफिरुला हटकले असता हल्लेखोराने चाकूचा धाक दाखवून तो गोल्हर गल्लीकडे पळून गेला. या घटनेला दोन दिवसांचा कालावधी उलटला असून अद्याप जिल्ह्यात सक्रीय असलेल्या प्राणी मित्र संघटना तसेच आदी विविध संघटनांनी याची दखल घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्याची मागणी वर्धेच्या युवा परिवर्तन की आवाज संघटनेने केली आहे. आरोपीला अटक न केल्यास आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला आहे. अज्ञात माथेफिरूने श्वानाच्या पोटावर चाकूने वार केल्यानंतर श्वानाने जीव वाचविण्याच्या प्रयत्नात पळ काढला. मात्र, काही अंतर दूरवर जातात श्वान जमिनीवर कोसळले आणि जागीच श्वानाचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली. ज्या ठाकरे चौकात ही क्रुर घटना घडली. तेथून पोलीस ठाणे अवघ्या ५० मीटर अंतरावर आहे. हातात खुलेआम चाकू घेऊन एक माथेफिरु परिसरात धिंगाणा घालतो ही मोठी शोकांतिका आहे.

घटस्फोटीत महिलेवर व्यावसायिक झाला फिदा, लग्न केलं युरोपला नेलं पण परत येताच पायाखालची जमीन सरकली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here