रत्नागिरी : रत्नागिरीच्या दापोली इथे बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. दापोली इथे दोन एसटीचा समोरासमोर अपघात झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई परळ-दापोली आणि दापोली-मुरादपुर या दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. दापोलीपासून जवळ मंडणगड मार्गावर मौजे खेर्डीजवळ सकाळी ८.३० च्या सुमारास अपघात झाला. यामध्ये जखमींमध्ये शाळकरी आणि कॉलेजच्या मुलांचा सामावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा कोसळणार, हवामान खात्याकडून कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट

सर्व जखमींवर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here