पुणे:मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. राज्य ठाकरे यांचा हस्ते आज नाव नोंदणीला सुरूवात होणार आहे. मात्र त्या पूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी हिंदूंचा हिंदुस्थानअसा उल्लेख करणारा पोस्टर झळवला आहे. या पूर्वी ही पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी हिंदु जननायक असा राज ठाकरेंचा उल्लेख केला होता. या पोस्टरची चर्चा आता होऊ लागली आहे.
आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसेची पक्ष बांधणी सुरू झाली आहे. काल राज ठाकरे यांची जाहीर सभा मुंबई येथे पार पडली. राज ठाकरे यांच्या पायच्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांना मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यानंतर त्यांची सभा पार पडली आणि आज पुण्यात नाव नोंदणी सुरू त्यांच्या हस्ते सुरू होणार आहे. एकंदरीतच येणाऱ्या निवडणुकांसाठी मनसेने कंबर कसली आहे, असे चित्र पाहायला मिळत आहेत. आज पुण्यात राज ठाकरेच्या पोस्टरवर आता भारत नाही तर हिंदूंचा हिंदुस्थान,हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी हिंदू जननायक, असे पोस्टर सगळ्यांचा चर्चेचा विषय ठरत आहे.
वाचा- Video: मेळघाटातील रस्त्यांबाबत बोलताना गडकरी अधिकाऱ्यांना म्हणाले, ‘मंत्रीपद गेले तरी काही फरक पडत नाही’
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या पूर्वीही भाषणाची शैली बदल तमाम जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो बदलू तमाम जमलेल्या माझ्या हिंदू बंधू आणि भगिनींनो, असा केल्यामुळे मोठी चर्चा रंगली होती. आज पुण्यात राज ठाकरेच्या पोस्टरवर भारत नाही तर हिंदूंचा हिंदुस्थान, हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी हिंदू जननायक असा पोस्टर कार्यकर्त्यांनी लावल्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. नेमकं आत राज ठाकरे या पुढे काय बोलतील या पोस्टर वरून मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
Like this:
Like Loading...
Купить мешки для сброса мусора на доступных условиях
пакеты для мусора [url=http://vladipak.ru/]мешки для мусора[/url].