मुंबई: अनेक बॉलिवूड चित्रपटांना ‘बॉयकॉट’ ट्रेंडचा फटका बसला आहे. ‘ब्रह्मास्त्र’ प्रदर्शित होण्यास काही दिवस असतानाच ‘बॉयकॉट ब्रह्मास्त्र’ हा ट्रेंड समाजमाध्यमावर चालवला जात आहे. ‘लाल सिंग चढ्ढा’प्रमाणे या चित्रपटालाही या आवाहनाचा फटका बसलाय. आगामी अनेक चित्रपटांना ‘बॉयकॉट’ केलं जाणार आहे. आता हे बॉयकॉटचं वारं मराठी सिनेसृष्टींत आलं आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी गायक आणि अभिनेते राहुल देशपांडे यांनी ‘लाल सिंग चढ्ढा’चं कौतुक केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. आता अभिनेता स्वप्नील जोशी देखील बॉटकॉटच्या लाटेत अडकताना दिसत आहे. आता तुझा एकही चित्रपट पाहणार नाही,असं नेटकरी म्हणत आहेत. त्याला कारण ठरलं आहे त्यानं नुकताच शेअर केलेला एक फोटो.

swapnil joshi news in marathi

स्वप्नीलनं बॉलिवूड अभिनेते अर्जुन कपूर आणि रणवीर सिंगसोबत शेअर केला. या तिघांनी नेमकी कशासाठी भेट घेतली हे अद्यापही समोर आलं नसतं तरी हा फोटो व्हायरल होतोय. फोटो पाहिल्यानंतर स्वप्नीलवर नेटकरी नाराज झाले आहेत. बॉयकॉट स्वप्नील जोशी असा ट्रेंड आता सुरू आहे. स्वप्नीलनं अर्जुनला सुपरस्टार असं म्हटल्यानं नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे.

रिंकूनं डिलिट केला फोटो
काही दिवसांपूर्वी रिंकून आमीर खान आणि नागा चैतन्य या दोघांसह फोटो शेअर केला होता. रिंकूची ही पोस्ट पाहून तिचे चाहते भडकले होते. काहींनी कमेंट केली आहे की आता यानंतर तुझेही चित्रपट Boycott केले जातील. ‘तुला अनफॉलो करतोय’, ‘असं नको करू, नाहीतर तु देखील बॉयकॉट’, ‘सॉरी रिंकू हा सिनेमा प्रमोट करू नको. त्यानंतर रिंकूनं हा फोटो डिलिट केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here