सिद्धूचे जुने फोटो, त्याची गाणी, जुने व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहेत. सिद्धूच्या पालकांनाही त्याच्या हत्येमुळे धक्का बसला आहे. अजूनही त्याचे वडील सिद्धूचा फोटो छातीशी कवटाळून बसत असल्याचे चित्र आहे. आता सिद्धूच्या मित्रांनी एक असा निर्णय घेतला आहे की त्यामुळे सिद्धूला भेटण्याचा अनुभव मिळणार आहे.
हे वाचा-या अभिनेत्रीविरोधात आशा भोसलेंनी गाठलं होतं पोलीस स्टेशन; विकोपाला गेलेलं भांडण
सिद्धू मुसेवाला याने गेल्या वर्षी एक गाणं रेकॉर्ड केलं होतं. पण ते गाणं रिलिज झालं नव्हतं. आता सिद्धूच्या चाहत्यांनी ते गाणं रिलीज करण्याचं ठरवलं आहे. यासाठी २ सप्टेंबर ही तारीखही निश्चित केली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गाण्याच्या रिलीजनंतर जी काही रक्कम हातात येईल त्यातील काही हिस्सा हा सिद्धूच्या आईवडीलांना आर्थिक मदत स्वरूपात दिला जाणार आहे. सिद्धूने त्याच्या आयुष्यात गायलेलं हे शेवटचं गाणं असल्याने त्याचं वेगळं मोल आहे.
सिद्धूचा मित्र सलीम मर्चंटने याबाबत माहिती दिली आहे. तो म्हणतोय, ‘जानदी वार’ असे या गाण्याचे बोल आहेत. गेल्या वर्षी अफसाना खानसोबत सिद्धूने हे गाणं गायलं होतं. या गाण्याचं रेकॉर्डिंग झालं पण रिलीज करण्यासाठी मुहूर्त मिळाला नाही. दरम्यान २९ मे रोजी सिद्धूची हत्या झाली आणि सगळच बदलून गेलं. सलीम आणि अफसाना यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत या सिद्धूच्या जानदी वार या नव्या गाण्याच्या प्रदर्शनाच्या तारखेची माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये सिद्धूची झलकही पाहायला मिळत आहे. गाण्याच्या निमित्ताने सुरूअसलेली चर्चाही या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

हे वाचा-घरी बोलावून निर्मात्याला बघायचं होतं तिचं पोट, अभिनेत्रीचा धक्कादायक अनुभव
कोणतंही गाणं अगदी हृदयापासून गाण्यात सिद्धू पटाइत होता. त्याचं गाण्याविषयीचं प्रेम प्रत्येकाला माहित आहे. त्याच आवेगानं सिद्धूने जानदी वार हे गाणं गायलं आहे असंही सलीम म्हणाला. या गाण्याचं रेकॉर्डिंग सिद्धू आणि सलीम यांचा मित्र सचिन आहुजा यांच्या स्टुडिओत झालं होतं. हे गाणं खूप संवेदनशील, भावनिक आणि मनाला स्पर्शून जाणारं आहे ज्यामुळे सिद्धूला प्रत्यक्ष गाणं म्हणताना पाहत आहोत की काय असं प्रत्येकाला वाटेल असंही सलीम म्हणाला. यानिमित्ताने सिद्धूच्या चाहत्यांनी त्याला सलामी दिली आहे.