Bhagyashree Rasal | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Aug 25, 2022, 2:54 PM
jacqueline fernandez money laundering case बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस अडचणीत सापडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मनी लाँड्रिंग प्रकरणामुळं ती चर्चेत आहे. ईडीनं नुकत्याच दाखल केलेल्या आरोपपत्रात जॅकलिनच्या नावाचादेखील समावेश आहे.

काय म्हणाली जॅकलिन?
ईडीला दिलेल्या जबाबात तिनं म्हटलं आहे की ,माझ्याकडं असलेला हा पैसा मी स्वत:च्या कष्टानं कमावलाय. मी आतापर्यंत जी काही बचत केली ती सर्व वैध आहे. माझ्या एफडी आहेत, त्या अनेक वर्षांपूर्वी केल्या होत्या. त्यावेळी मी सुकेशला ओळखतही नव्हते.
काय आहे नेमकं हे प्रकरण?
तिहार तुरुंगात असलेल्या सुकेश याच्याशी संबंध उघडकीस आल्यामुळं, गेल्या वर्षापासून ईडीकडून जॅकलिनची चौकशी सुरू आहे. तपासाअंती तिलाही आरोपी बनविण्यात आलंय. सुकेशकडून जॅकलिननं तब्बल सात कोटी रुपयांच्या भेटवस्तू स्वीकारल्याचं ईडीच्या तपासात उघडकीस आलं असून, त्यामध्ये महागडी मोटार, दागिने व रोख रकमेसह ५२ लाख रुपयांचा एक घोडा आणि नऊ लाख रुपयांच्या एका मांजरीचाही समावेश आहे. तिच्या सात कोटी रुपयांच्या संपत्तीवर ईडीनं टाच आणली आहे. याप्रकरणी तिला अटक झाली नसली, तरी देशाबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे; त्यामुळं तिचे आगामी चित्रपट अडचणीत सापडले आहेत.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.