राज्याचा कंत्राटी मुख्यमंत्री म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची काल खिल्ली उडवली होती. त्यांच्या टीकेला आज एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. “मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरला तर तुम्ही केंद्रीय मंत्री नारायण राणेंना जेलमध्ये टाकलं, जेवणंही करु दिलं नाही. पण मला त्यांना सांगायचंय, आम्ही घटनेच्या विरोधात कोणतंही कृत्य केलेलं नाही. होय, मी कंत्राटी मुख्यमंत्रीच, महाराष्ट्राच्या विकासाचं, राज्य समृद्ध करण्याचं, गरीब जनतेचे अश्रू पुसण्याचं, लोकांमध्ये मिसळून त्यांचं दुःख दूर करण्याचं, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचं आणि बहुजनांच्या विकासाचं मी कंत्राट घेतलंय”

jayant patil And Eknat Shinde
जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे

मुंबई : “जयंतराव मला काल तुम्ही मुख्यमंत्रिदाची ऑफर दिली, पण तुम्हाला साधं विरोधी पक्षनेता तरी होता आलं का?, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लगावला. तुम्हाला विरोधी पक्षनेते होता आलं नाही याचं दु:ख काल तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होतं, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी कालच्या जयंत पाटलांच्या भाषणाला तोडीस तोड उत्तर दिलं.

राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते जयंत पाटील यांचं सभागृहातलं भाषण म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांसाठी पुरती मेजवानी असते. सहकारी मित्रांना सल्ले, जवळच्या अन् लांबच्या मित्रांना टोले तर आपल्याच माणसांपैकी दुरावलेल्या व्यक्तींना टोमणे अशी त्यांच्या भाषणाची गुंफण असते. एखाद्याच्या जहाल टीकेने प्रतिस्पर्ध्याला जमख व्हायची नाही त्यापेक्षा कैक पटींनी खोलवर जखम जयंतरावांच्या मवाळ शब्दांनी होते. याचा प्रत्यय काल दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आला होता. भाजपने तुम्हाला मनावर दगड ठेऊन मुख्यमंत्री केलंय.. एकनाथराव तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुमच्या कोणताही दगड न ठेवता मुख्यमंत्री करतो, अशी ऑफरच जयंतरावांनी एकनाथ शिंदे यांना दिली होती. त्यांच्या याच भाषणाला मुख्यमंत्र्यांनी आज उत्तर दिलं.

‘मागच्या रांगेवरुन’ डिवचणाऱ्या जयंत पाटलांना एकनाथ शिंदे म्हणाले, मी काय…
तुम्हाला विरोधी पक्षनेता होता का आलं का?

एकनाथ शिंदे म्हणाले, “तुम्ही मला काल मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली, पण अगोदर अजितदादांना विचारलं का? कारण दादांची दादागिरी नेहमी चालते… ती चालायला देखील हवी, कारण ते आमचे मित्र आहेत…. पण जयंतराव तुम्हाला साधं विरोधी पक्षनेता तरी होता आलं का? तुम्हाला विरोधी पक्षनेते होता आलं नाही याचं दु:ख काल तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होतं”

वा दादा! अजित पवारांचं अचूक नियोजन, ‘कॅग’कडून आर्थिक शिस्तीचं कौतुक
मुख्यमंत्र्यांचं उद्धव ठाकरे यांना उत्तर

राज्याचा कंत्राटी मुख्यमंत्री म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची काल खिल्ली उडवली होती. त्यांच्या टीकेला आज एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. “मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरला तर तुम्ही केंद्रीय मंत्री नारायण राणेंना जेलमध्ये टाकलं, जेवणंही करु दिलं नाही. पण मला त्यांना सांगायचंय, आम्ही घटनेच्या विरोधात कोणतंही कृत्य केलेलं नाही. होय, मी कंत्राटी मुख्यमंत्रीच, महाराष्ट्राच्या विकासाचं, राज्य समृद्ध करण्याचं, गरीब जनतेचे अश्रू पुसण्याचं, लोकांमध्ये मिसळून त्यांचं दुःख दूर करण्याचं, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचं आणि बहुजनांच्या विकासाचं मी कंत्राट घेतलंय”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here