Asia cup 2022 : . विराटचे पाकिस्तानमध्ये भरपूर चाहते आहेत. त्यामुळे विराटने आपल्या देशात खेळण्यासाठी काही वेळा चाहत्यांनी विनंती केली आहे. पण सुरक्षेच्या कारणास्तव कोहली तिथे जाऊ शकला नाही. पण ही संधी या चाहत्याने सोडली नाही. यानंतर चाहत्याने एक भन्नाट युक्ती केली आणि त्यानंतर कोहलीने त्याच्याबरोबर सेल्फी काढला, पाहा व्हिडिओ…

वाचा-विनोद कांबळीला मिळाली होती एक लाखाच्या नोकरीची ऑफर, पण त्याचं पुढे काय झालं पाहा…
कोहली त्यानंतर तिथून निघून गेला होता. त्यावेळी या चाहत्याने एक युक्ती केली. हा फॅन त्यावेळी जोरात ओरडला की, ” मी पाकिस्तानमधून आलो आहे आणि मला विराट कोहलीबरोबर फोटो काढायचा आहे.” या चाहत्याची ही गोष्ट ऐकून विराट बाहेर आला आणि त्याने या मुलाबरोबर सेल्फी काढल्याचे पाहायला मिळाले. विराटचे पाकिस्तानमध्ये भरपूर चाहते आहेत. त्यामुळे विराटला पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी बऱ्याचदा तेथील चाहत्यांनी विनंती केली आहे. पण सुरक्षेच्या कारणास्तव कोहली तिथे जाऊ शकला नाही. पण जेव्हा भारत आणि पाकिस्तान अशा काही मोठ्या स्पर्धांमध्ये समोरा समोर येतात तेव्हा चाहत्यांना आपल्या आवडत्या खेळाडूंना भेटण्याची संधी असते. हीच संधी यावेळी या चाहत्याने दवडली नाही. भारताचा सराव सुरु असताना तो तिथे होते आणि सराव संपल्यावर तो लगेच कोहलीच्या दिशेने गेला. हा चाहता पाकिस्तानचा असल्याचे समजल्यावर कोहलीनेही त्याला निराश केले नाही. कोहली या पाकिस्तानच्या चाहत्यासाठी पुन्हा बाहेर आला आणि त्याच्याबरोबर सेल्फी काढली.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.