मुंबई : महाराष्ट्राच्या पोलीस दलातील धाडसी आणि निर्भीड अधिकारी म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक कृ्ष्ण प्रकाश यांची ओळख संपूर्ण राज्याला आहे. कृष्ण प्रकाश यांनी त्यांच्या आईबद्दल भावनिक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. आईनं शेवटपर्यंत देवाधिदेव विघ्नहर्ता गणरायाला आपल्यासोबत ठेवलं होतं. आई गणेशोत्सव येत आहे आणि तू निघून गेली, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. कृष्ण प्रकाश यांच्या आईचं १९ ऑगस्टला निधन झालं.

कृष्ण प्रकाश यांनी २० ऑगस्ट रोजी फेसबुक पोस्ट करुन त्यांच्या आईचं निधन झाल्याचं सांगितलं. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, काल सायंकाळी ६.१७ वा मिनिटांनी आम्ही आमची आई गमावली आणि भिकारी झालो, अशा भावना त्यांनी आईविषयी व्यक्त केल्या आहेत.

एकनाथ शिंदेंनी सांगितला उद्धव ठाकरेंच्या फोनचा ‘तो’ किस्सा, अजित पवारांनीही हात जोडले!

गणेशोत्सव येतोय आणि तू निघून गेली

कृष्ण प्रकाश यांनी आज एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. कृष्ण प्रकाश यांनी त्यांच्या आईसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्या पोस्टमध्ये ते म्हणतात, आईनं अखेरच्या क्षणापर्यंत देवाधिदेव विघ्नहर्ता गणरायाला आपल्या सोबत ठेवलं. आई गणेशोत्सव येतोय आणि तू निघून गेली, अशी भावनिक पोस्ट कृष्ण प्रकाश यांनी त्यांच्या आईच्या आठवणी निमित्त केली आहे.

आयपीएस कृष्ण प्रकाश यांची आईच्या आठवणीत भावनिक पोस्ट

आयपीएस कृष्ण प्रकाश यांची आईच्या आठवणीत भावनिक पोस्ट

पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं, हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार, तारीखही ठरली!

कृष्ण प्रकाश यांची आयर्नमॅन अशी ओळख

कृष्ण प्रकाश यांनी महाराष्ट्रात सांगली, पिंपरी चिंचवडसह महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली आहे. सध्या ते महाराष्ट्र पोलीस दलात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. २०१७ मध्ये त्यांनी फ्रान्समध्ये आयर्नमॅन ट्रायथलऑन ही स्पर्था जिंकली होती. कृष्ण प्रकाश हे १९९८ च्या बॅचचे अधिकारी आहेत. २०१२ मध्ये ते मुंबईत कार्यरत होते. पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवली होती.

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी लांबणीवर,सुप्रीम कोर्टातील घटनापीठ कोण स्थापन करणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here