मुंबईः वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन २०२२ पॉवर्ड बाय टुगेदरिंग अॅप, को पॉवर्ड बाय रिजेन्सी या स्पर्धेमध्ये आयुषी कुलकर्णी हिने (मध्यभागी) ‘’ होण्याचा मान मिळवला. या स्पर्धेमध्ये ऋचा गायकवाड (उजवीकडून पहिली) प्रथम उपविजेती, तर मृणाल बोकील द्वितीय उपविजेती ठरली. वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे गुरुवारी हा सोहळा रंगला. ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन स्पर्धे’च्या या महाअंतिम फेरीचे परीक्षण लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगावकर, डॉ. नंदिता पालशेतकर, अभिनेता प्रसाद ओक, अभिनेत्री अमृता सुभाष आणि फॅशन डिझायनर नचिकेत बर्वे यांनी केले.

मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या चारही शहरांमध्ये श्रावणक्वीन स्पर्धेची प्राथमिक फेरी रंगली. या प्राथमिक फेरीमधून निवडलेल्या २० स्पर्धकांना रॅम्पवॉकपासून मेकअप, हसण्याची पद्धत, आरोग्याची काळजी, पेहराव अशा विविध गोष्टींचे मार्गदर्शन करण्यात आले. या २० सौंदर्यवतींमधून अंतिम फेरीमध्ये तीन सौंदर्यवती महाअंतिम फेरीमध्ये दाखल झाल्या. चारही शहरांमधील निविषा नवघरे, मोहिका गद्रे, वैष्णवी पाटोळे, अंकिता लहामगे, डॉ. कृपा म्हस्के, आर्या काळे, संपदा निखाडे, वैष्णवी ताम्हणकर, आयुषी कुलकर्णी, मृणाल बोकील, पूजा मिठबावकर, ऋचा गायकवाड या १२ सौंदर्यवतींना आठवडाभराच्या कालावधीमध्ये विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here