Loksabha Election 2024 | शिवसेनेची पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका. ईडी (ED) आणि सीबीआयच्या (CBI) कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थि केले. केंद्र सरकार आणि त्यांच्या सूत्रधारांना २०२४ चे भय वाटते. या सूत्रधारांना आपल्या सावलीचेही भय वाटते. म्हणून ते नितीन गडकरी आणि शिवराजसिंह चौहान यांच्या पाठी लागले आहेत. असा दावाही शिवसेनेने केला आहे.

हायलाइट्स:
- देशात संभ्रमित युग अवतरले आहे
- देशाची परिस्थिती संभ्रमित झाल्याचे शरद पवार यांनी म्हटले
- धाडसत्र आणि सूडाची छापेमारी ही त्यांचे शस्त्रे आहेत
केंद्र सरकार व त्यांच्या सूत्राधारांना २०२४ चे भय वाटते. हे भय केजरीवाल, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे आहे. इतके मोठे बहुमत असतानाही या मंडळींना भय का वाटावे? याचे उत्तर एकच हे बहुमत निखळ नाही. ते चोरलेले आहे. धाडसत्र आणि सूडाची छापेमारी ही त्यांचे शस्त्रे आहेत. त्याच शस्त्रांनी त्यांचे ‘ऑपरेशन कमळ’ होते, पण कमळाच्या लाभार्थ्यांवर सरकारी छाप्यांचे वार होत नाहीत. देशाच्या न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. पण या न्यायनिवाड्यास विलंब होऊ नये, एवढीच जनतेची अपेक्षा आहे, असे ‘सामना’तील अग्रलेखात म्हटले आहे. केंद्र सरकार आणि त्यांच्या सूत्रधारांना २०२४ चे भय वाटते. या सूत्रधारांना आपल्या सावलीचेही भय वाटते. म्हणून ते नितीन गडकरी आणि शिवराजसिंह चौहान यांच्या पाठी लागले आहेत. असा दावाही शिवसेनेने केला आहे.
आज राज्यकर्त्यांचा कारभारच असा सुरु आहे की, देशात संभ्रमित युग अवतरले आहे. देशाची परिस्थिती संभ्रमित झाल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. अशा अनेक गोष्टींचे सध्या पेव फुटले आहे. हे संभ्रमाचे युग संपवण्यासाठी कोण अवतार घेणार? नाहीतर जनतेलाच नरसिंहाचा अवतार धारण करावा लागेल, असेही ‘सामना’त म्हटले आहे.
भडकलेल्या मुनगंटीवारांना समजावताना आदित्य ठाकरे म्हणाले, मी तुमच्यापासूनच प्रेरित
शिवसेनेकडून ‘आप’ची पाठराखण
उत्पादन शुल्क गैरव्यवहाराच्या प्रकरणावरून सध्या दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया कचाट्यात सापडले आहेत. शिवसेनेने अग्रलेखातून त्यांची पाठराखण केली आहे. मनिष सिसोदिया यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. पण सिसोदिया हे काही पळून जाणारे गृहस्थ नाहीत. एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे केंद्र सरकारने त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करून लोकनियुक्त सरकारची मानहानी केली. महाराष्ट्रातही सरकार पाडण्यासाठी ईडीचा वापर झाला. संजय राऊत यांनाही सरकार पाडण्यासाठी मदत करा, नाहीतर ईडीचा फास आवळू, अशा धमक्या देण्यात आल्या. संजय राऊत यांनी ही गोष्टी राज्यसभेचे तत्कालीन उपसभापती व्यंकय्या नायडू यांना कळवली होती. पण सध्या कोण कोणाचे ऐकणार? ना पेशी, ना सुनवाई. तारखांचाच खेळ सुरु आहे, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.