मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर शुक्रवारी (२६ ऑगस्ट) वाहतूक कोंडी होणार आहे. किवळे ते सोमाटणे दरम्यानची वाहतूक बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ओव्हर हेड गॅन्ट्री उभारण्याचे काम दुपारी १२ ते २ या वेळेत सुरू होणार आहे. वाहनधारकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाकडून यापूर्वीच सूचना करण्यात आल्या आहेत. या माहितीनुसार मुंबईहून पुण्याकडे किंवा पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या एक्सप्रेस वेवरील वाहनधारकांना किवळे ते सोमाटणे दरम्यानच्या पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. हा रस्ता महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या शहरांना जोडतो. मात्र, काल दुपारी दोन तास या मार्गावरील किवळे ते सोमाटणे दरम्यानची वाहतूक बंद ठेवल्याची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुण्यातील कचरावेचकाच्या खूनाचे गुढ उकलले; समोर आली धक्कादायक माहिती
किवळे ते सोमाटणे दरम्यान दुरूस्तीचे काम…

भविष्यात कोणतीही मोठी समस्या उद्भवू नये, यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी १२ ते २ या वेळेत हे काम केले जाणार आहे. वाहन धारकांना मार्गदर्शन करण्यासाठी जागोजागी रक्षक नेमण्यात आले आहेत. या रस्त्यावरून ये-जा करणार्‍यांना येणाऱ्या कोणत्याही त्रासाला सामोरे जाण्यासाठी हे रक्षक मदत करतील.

यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी आणि मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक सोमाटणेजवळील जुन्या रस्त्यावरून उर्से टोल नाक्याकडे वळवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना विशेष अडचणीचा सामना करावा लागणार नाही. वाहनधारकांनी या पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

मैत्रिणीनेच टाकला तरुणीवर हनीट्रॅप; प्रियकर बोलत असल्याचे भासवून केली मोठी फसवणूक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here