Abdul Sattar election affidavit | सिल्लोड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने मंत्री अब्दुल सत्तार यांची या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता टीईटी घोटाळ्यापाठोपाठ अब्दुल सत्तार पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. राज्य शिक्षण परिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अपात्र विद्यार्थ्यांच्या याद्यांमध्ये अब्दुल सत्तार यांच्या मुलींच्या नावाचा समावेश आहे. सत्तार काय भूमिका मांडणार?

 

Abdul Sattar
कृषीमंत्री अब्दुल सत्तार

हायलाइट्स:

  • ‘परिशिष्ट ब’ च्या यादीत सत्तारांच्या मुलींचा समावेश
  • ‘परिशिष्ट ब’ यादी म्हणजे बनावट टीईटी प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप
  • 2019च्या परीक्षेत सत्तारांच्या मुली नापास झाल्या होत्या
मुंबई: राज्याती शिक्षणक्षेत्रात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या टीईटी परीक्षा घोटाळप्रकरणात शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांच्यापाठी लागलेले शुक्लकाष्ठ काही पाठ सोडायला तयार नाही. अब्दुल सत्तार यांनी आपल्या मुलींकडून अशाप्रकारचा कोणताही गैरप्रकार न झाल्याचा छातीठोक दावा केला होता. परंतु, राज्य शिक्षण परिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अपात्र विद्यार्थ्यांच्या याद्यांमध्ये अब्दुल सत्तार यांच्या मुलींच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे सत्तार पुन्हा अडचणीत आले आहेत.

टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुलींवर नेमका आरोप काय?

टीईटी घोटाळा प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेकडून अपाञ परीक्षार्थींच्या एकूण तीन याद्या प्रसिध्द करण्यात आल्या. यापैकी ‘परिशिष्ट ब’ च्या यादीत सत्तारांच्या मुलींचा समावेश आहे. ‘परिशिष्ट ब’ यादी म्हणजे बनावट टीईटी प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप. TET 2019च्या परीक्षेत सत्तारांच्या मुली नापास झाल्या होत्या. तरीही त्यांनी एजंटकरवी बनावट प्रमाणपत्र पञ मिळवल्याचा आरोप आहे. एकूण २९३ परीक्षार्थींनी सुपेंकडून अशी बनावट प्रमाणपत्र मिळवली होती. बोगस प्रमाणपत्र मिळवणाऱ्या २९३ जणांचा परीक्षा परिषदेच्या अंतिम निकालात कुठेही समावेश नव्हता. परीक्षा परिषदेच्या वेबसाइटवर तिन्ही याद्या प्रसिद्ध आहेत. बनावट प्रमाणपञ घेतल्याचे पोलीस तपासात उघड झाल्यानेच सत्तारांच्या मुलींचे पगार थांबवण्यात आले आहेत.
TET Scam: ४४७ शिक्षकांचे वेतन थांबविण्याचे आदेश
अब्दुल सत्तारांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहिती चुकीची

अब्दुल सत्तार यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहितीवरूनही आता नवा पेच उभा राहिला आहे. सिल्लोड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि अभिषेक हरदास यांनी यासंदर्भात न्यायालया याचिका दाखल केली होती. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या बिगरशेती जमीन, निवासी इमारत आणि वाणिज्य इमारत याबाबतच्या माहितीत तफावर आहे, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर सिल्लोड येथील प्रथमवर्ग दंडाधिकारी न्यायालयाने पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांना यासंदर्भातील अहवाल सादर करण्यासाठी ६० दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे आता टीईटी घोटाळ्यापाठोपाठ आणखी एक मुद्द्यावरून अब्दुल सत्तार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

माझ्याविरुद्ध कट रचणाऱ्याला फासावर चढवलं पाहिजे, कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार आक्रमक

टीईटी घोटाळा प्रकरणात शिक्षणाधिकाऱ्यांच्या मुलीचेच नाव

शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहारात माध्यमिक शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख यांच्या मुलींचे नावही जोडले जात आहे. अपात्र ठरूनही पात्रतेच्या यादीत ५५७३व्या क्रमांकावर नूपुर मधुकर देशमुख यांचे नाव आहे. शिक्षक पात्रता परीक्षा २०१९मधील संपादणूक रद्द करून यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंध घालण्यात आले आहे. नूपुर मधुकर देशमुख यांचे नाव टीईटी परीक्षेत अपात्र असताना प्रमाणपत्रात खाडाखोड करून पात्रतेच्या यादीत असल्याचे सांगण्यात येते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here