जबलपूर : महिला अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत अशात एक मन सून्न करणारा प्रकार समोर आला आहे. मुंबईहून रक्षा बंधन साजरा करण्यासाठी आपल्या भावंडांकडे गेलेल्या तरुणीसोबत असं काही घडलं तुम्हीही हा प्रकार वाचून हादराल. मध्य प्रदेशातील जबलपूर इथे १६ वर्षीय तरुणी मुंबईहून भावांना राखी बांधण्यासाठी गेली होती. पण तिथे तिच्याच चुलत भावांनी तिच्या बलात्कार केल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६५ वर्षीय आजीवर बलात्कार केल्या प्रकरणी दोन भावांना गुरुवारी अटक करण्यात आली. या घटनेनंतर १६ वर्षीय पीडितेचा अंतर्गत जखमांमुळे मृत्यू झाला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिलीप शेंडे यांनी पीटीआयला सांगितले की २१-२२ वयोगटातील दोन्ही आरोपींनी नुकतेच रांझी परिसरात किशोरीवर बलात्कार केल्यानंतर तिला मारहाण केली, त्यानंतर २० ऑगस्ट रोजी तिच्यावर उपचार सुरू होते. यावेळी पीडितेचा रुग्णालयात मृत्यू झाला.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर आज २ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक, या पर्यायी मार्गाने करा प्रवास
‘मुंबईहून रक्षाबंधनासाठी पीडिता जबलपूरमध्ये आली होती. अल्पवयीन मुलगी अविवाहित असल्याने तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेच्या आजीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा त्यांनी आरोपी भावांना बलात्कार करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने तिच्यावरही बलात्कार केला.

नेमकं काय घडलं?

पीडित तरुणी रक्षा बंधनासाठी गेली असता तिच्या दोन चुलत भावांनी तिच्या बलात्कार केला तिने रोखण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिला बेदम मारहाणही केली. यानंतर नराधमांनी तरुणीला पेटवून दिलं आणि अपघाती मृत्यू असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी तिला मारहाण करून घरीच जखमी अवस्थेत ठेवलं होतं. त्यानंतर पुढे उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.

महाराष्ट्र पोलिसांची मोठी कारवाई, टीप मिळताच घरात टाकला छापा; सापडलं मोठं घबाड
पोस्टमार्ट रिपोर्ट आल्यानंतर आजींनीच या घटनेचा खुलासा केला. तरुणीवर बलात्कार झाला असून आरोपींनी आजीवरही बलात्कार केल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here