phulambri aurangabad bailpola | ग्रामीण भागात बैलपोळ्याचा सण अत्यंत महत्त्वाचा असतो. यादिवशी शेतकरी आपल्या लाडक्या बैलांना सजवतात, गोडधोड खाऊ घालतात. पंढरीनाथ यांनी देखील पोळा असल्याने त्यांचे दोन्ही बैल धुण्यासाठी गावातील पाझर तलावात आणले होते. मदतीला पुतण्या रितेशला सोबत आणले होते. तलावच्या काठावर दोन्ही काका पुतणे बैलांना आंघोळ घालत होते.

हायलाइट्स:
- बैलांचा पूजनाचा दिवस म्हणजे बैलपोळा
- पोळ्याच्या पूर्वसंध्येला गावात शोककळा.
वर्षभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचा जवळचा मित्र मानल्या जाणाऱ्या बैलांचा पूजनाचा दिवस म्हणजे बैलपोळा. या सणाची शेतकरी वर्गात आठ दिवसांपूर्वी पासूनच लगबग सुरु असते. पंढरीनाथ यांनी देखील पोळा असल्याने त्यांचे दोन्ही बैल धुण्यासाठी गावातील पाझर तलावात आणले होते. मदतीला पुतण्या रितेशला सोबत आणले होते. तलावच्या काठावर दोन्ही काका पुतणे बैलांना धुत होते.
दरम्यान त्यातील एका बैलाने त्यांना जोराचा धक्का दिला. जोरदार धक्क्याने पंढरीनाथ यांच्या हातातील बैलांची दोरी सुटली आणी ते तलावच्या पाण्यात पडले. काका बुडत असल्याचे पाहून पुतण्या रितेशने देखील वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली.मात्र दोघेही पाण्यात बुडाले.ही बाबा कळतच इतर शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दोघांना पाण्यातून बाहेर काढून तातडीने ग्रामीण रुग्णाल्यात हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून दोन्ही काका पुतण्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे पोळा सणाच्या पूर्वसंध्येला गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.