MPSC News :  एमपीएससीनं एक मोठा निर्णय घेतला आहे. उमेदवारांना (MPSC Candidate) भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी दिलेल्या पर्यायामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) आयोजित विविध स्पर्धा परीक्षेद्वारे पदभरतीकरता (recruitment) भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय उमेदवारांना उपलब्ध करून देण्याचे अनुषंगाने 26 नोव्हेंबर 2021 रोजी निर्णय घेतला होता. आता या पर्यायाच्या कार्यपद्धतीमध्ये काही सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाकडून घेण्यात आला आहे. आता उमेदवारांची  तात्पुरती निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्याच्या आधारे भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय सादर करण्यासाठी संबंधित उमेदवारांना सात दिवसाचा कालावधी देण्यात येईल, असं MPSCकडून सांगण्यात आलं आहे. 

काय आहेत सुधारणा ? भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी काय आहे पर्याय?

* विद्यमान कार्यपद्धतीनुसार भरती प्रक्रिया करिता अंतिम शिफारसी पूर्वी  सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येते

*स्पर्धा परीक्षेद्वारे बहुसंवर्गीय भरतीप्रक्रिया करिता सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे प्रथम संवर्गाच्या पसंती क्रम सादर करण्यासाठी सात दिवसाचा कालावधी संबंधित उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येईल

* स्पर्धा परीक्षेद्वारे बहुसंवर्गीय भरती प्रक्रियेकरिता संबंधित उमेदवारांना प्राप्त पसंती क्रमांकाच्या आधारित प्रचलितपणे नुसार तात्पुरती निवड यादी तयार करण्यात येईल

* बहुसंवर्गीय भरती प्रक्रिया नसलेल्या स्पर्धा परीक्षा करीता सर्व साधारण गुणवत्ता यादीच्या आधारे प्रचलित पद्धतीने नुसार तात्पुरती निवड यादी तयार करण्यात येईल

* तात्पुरती निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्याच्या आधारे भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय सादर करण्यासाठी संबंधित उमेदवारांना सात दिवसाचा कालावधी देण्यात येईल

* तात्पुरती निवड यादी तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय सादर केलेल्या उमेदवारांचा डेटा लक्षात घेऊन अंतिम शिफारस यादी तयार करण्यात येईल

बहुसंवर्ग भरती प्रक्रिया करिता पसंती क्रमांक सादर करणे तसेच सर्व स्पर्धा परीक्षाद्वारे भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे याबाबतची कार्यवाही फक्त आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे दिलेल्या कालावधीत पूर्ण करणे अनिवार्य असेल

भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याबाबतचा सदर निर्णय सर्वप्रलंबित तसेच यापुढील सर्व स्पर्धा परीक्षा निकाल प्रक्रियेसाठी लागू  राहील

इतर महत्वाच्या बातम्या

Pune MPSC Student protest : परीक्षा पास, मात्र अजूनही नियुक्ती नाही, भावी अधिकाऱ्यांचं लोळून आंदोलन

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

1 COMMENT

  1. Fantastic website ɑnd broker ѡith the loweest
    cost in the industry! І’ve been maқing money sіnce I ѕtarted to uuse thdir robots!
    І ԝould recommend anyone to ⅽonsider giving Quantum Аi a try!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here