३ जूनला निसर्ग चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीला धडक दिली. मुंबईच्या दिशेनं येत असलेल्या निसर्ग चक्रीवादळानं रौद्ररूप धारण केले होतं. रत्नागिरीजवळ ‘बसरा स्टार’ हे व्यापारी जहाज वादळात अडकले होते. या जहाजाला मोठ्या प्रयत्नानं रत्नागिरीतील मिऱ्या बंदरापर्यंत आणण्यात तटरक्षक दलाच्या जवानांना यश आलं होतं. मात्र, हे जहाज मिऱ्या येथील खडकात अडकून फसले आहे. या जहाजाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी डिजी शिपिंग कंपनीचे अधिकारी व जिल्हा प्रादेशिक बंदर अधिकारी जहाजाला लवकरच सुरक्षित बाहेर काढण्याच्या दृष्टीने निर्णय घेणार आहेत. हे जहाज नर्मदा जेटीवर लावण्याची परवानगीही घेण्यात आली आहे. जहाजावरील १३ खलाशांना कुवारबांव येथे क्वारंटाइन केलं आहे.
या जहाजाला मुंबई किनाऱ्यावर यायचे होते. निसर्ग वादळाच्या तडाख्यामुळं पण रत्नागिरीजवळील मिरकरवाडी भागात हे जहाज जोरदार वादळात व खवळलेल्या समुद्रात अडकून पडले.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines