Maharashtra Rain News Today : राज्यात गणेशोत्सवाची धूम असताना आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशात आता हवामान खात्याकडून मान्सूनसंबंधी महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. यंदा पाऊस लवकर ब्रेक घेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

एकंदरीत मान्सूनचा परतीचा प्रवास १७ सप्टेंबरपासून सुरू होतो आणि ३० सप्टेंबरपर्यंत मान्सून निरोप घेतो. पण यंदा मान्सून लवकर जाणार आहे. बदलत्या हवामानाचा मोठा परिणाम पाऊस-पाण्यावर होत असतो. त्यामुळे आता पावसाचे स्वरुपही बदलले आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. तुफान पावसामुळे धरणांमध्ये चांगला पाणीसाठी जमा झाला आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.