nashik acb arrested engineer dinesh kumar bagul: आदिवासी विभागात कार्यकारी अभियंता म्हणून काम करणाऱ्या दिनेश कुमार बागलशी संबंधित मालमत्तांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं धाडी टाकल्या आहेत. त्याच्या घरांची झाडाझ़डती सुरू आहे. आतापर्यंत कोट्यवधींची रोकड सापडली आहे.

 

dinesh bagul
लाचखोर अधिकारी दिनेश कुमार बागुल अटकेत
नाशिक: आदिवासी विभागाचा कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुलच्या घरांची झाडाझडती सुरू आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि धुळ्यातील बागुलच्या घरांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं छापे टाकले आहेत. बागुलच्या दोन घरांमध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड सापडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्याच्या इतर घरांमधील आणि लॉकरमधील रोख रकमेची मोजदाद अद्याप बाकी आहे.

आदिवासी विभागात कार्यकारी अभियंता म्हणून काम करणाऱ्या दिनेश कुमार बागलशी संबंधित मालमत्तांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं धाडी टाकल्या आहेत. त्याच्या घरांची झाडाझ़डती सुरू आहे. आतापर्यंत कोट्यवधींची रोकड सापडली आहे. बागुलनं रोख, सोनं, बेनामी संपत्तीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची माया जमवल्याचा संशय एसीबीला आहे. बागुलशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारीदेखील एसीबीच्या रडारवर आहेत. बागुलच्या घरांमध्ये सापडलेली रोख रक्कम मोजण्यासाठी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी नोटा मोजण्याचं मशीन मागवलं आहे.

दिनेश कुमार बागुलला काल संध्याकाळी अटक करण्यात आली आहे. २८ लाख रुपयांची लाच घेताना बागुल एसीबीच्या जाळ्यात सापडला. सेंट्रल किचनच्या कामासाठी त्यानं १२ टक्के दरानं लाच मागितली होती. अडीच कोटी रुपयांचं काम मंजूर करण्यासाठी बागुलनं पैसे मागितले होते. हेच पैसे घेताना तो पकडला गेला. काल रात्रभर बागुलच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. त्याच्या इतर मालमत्तांची चौकशी सध्या सुरू आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here