three kidneys in baby, OMG! व्यावसायिकाच्या शरीरात एक-दोन नव्हे तर चक्क ३ किडन्या, अल्ट्रासाऊंड करताच डॉक्टर हैराण – three kidneys found in businessman body strange medical case doctor surprised kanpur news today
कानपूर : जगात सध्या अनेक चित्रविचित्र प्रकार समोर येत असतात. अशात एका घटनेनं सगळ्यांनाच थक्क केलं. सर्वसाधारण: प्रत्येकाला दोन किडन्या असतात. पण कानपूरच्या एका व्यापाऱ्याला एक दोन नव्हे तर तब्बल ३ किडन्या असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत.
होय, या घटनेला निसर्गाचा करिष्मा म्हणावं लागेल. कारण ही बाब समोर आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सुशील गुप्ता असं या व्यक्तीचं नाव आहे. २०२० मध्ये त्यांच्या मूत्राशयाचे ऑपरेशन करण्यासाठी अल्ट्रासाऊंड चेकअप केली होती. तेव्ह त्यांच्या अल्ट्रासाऊंडमध्ये त्यांना तीन मूत्रपिंड असल्याचं उघड झालं. सुरुवातीला त्यांनी हे प्रकरण फारसं गांभीर्याने घेतलं नाही. पण काही महिन्यांनी पुन्हा त्यांचा अल्ट्रासाऊंड करण्यात आला, ज्यामध्ये पुन्हा एकदा त्यांना ३ किडन्या असल्याचं समोर आलं. डिलिव्हरी बॉय एका झटक्यात कसा काय झाला करोडपती; २ कोटींची गाडी, दुबईला बंगला…
३ किडन्या असूनही काहीही त्रास नाही…
सुशील गुप्ता यांनी सांगितले की, त्यांचे वय ५२ वर्षे आहे. त्यांना आतापर्यंत कोणतीही अडचण आली नाही. तो सामान्यपणे आपलं जीवन जगत आहेत. आजपर्यंत त्यांना या किडनीमुळे कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा समस्या जाणवलेली नाही. तुम्हाला वाचून आनंद होईल की सुशील गुप्ता यांनी आधीच नेत्रदान करण्याचा संकल्प केला आहे.
अवयन दान करण्याचे वचन…
गुप्ता यांना जेव्हा ३ किडनी असल्याचं कळलं. त्यानंतर त्यांनी अवयव दानही करण्याचा संकल्प केला आहे. जर कोणाला किडनीची गरज असेल आणि ती देण्यास सक्षम असेल, तर ते नक्कीच आपली किडनी दान करतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे. इतकंच नाहीतर मृत्यूनंतर आपले सर्व अवयव दान करण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे.
किडनीद्वारेही माणूस जगू शकतो हे वैद्यकीय शास्त्रात सिद्ध झाले आहे. एखाद्या व्यक्तीची किडनी खराब झाली, तर अनेक लोक त्यांची एक किडनी त्यांना देतात, जेणेकरून एका किडनीवर सहज पूर्ण आयुष्य जगता येऊ शकेल.