BMC Election 2022 | भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना किशोरी पेडणेकर यांनी नितेश राणे (Nitesh Rane) यांना सुनावले. किशोरी पेडणेकरांचा प्रहार;’नितेश राणे बापाचं ऐकत नाही, तो इतरांचं काय…’

हायलाइट्स:
- सगळ्या बाजूंनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात रान पेटवले जात आहे
- मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे हेच जिंकणार आहेत
- आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे
यावेळी किशोरी पेडणेकर यांनी नितेश राणे आणि भाजपचा चांगलाच समाचार घेतला. सगळ्या बाजूंनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात रान पेटवले जात आहे. मात्र, मी तुम्हाला आज सांगते, की मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे हेच जिंकणार आहेत. तुम्ही अनेक पक्ष फिरुन येणार आणि नंतर ज्या पक्षात राहणार त्यांच्यासाठी गळे काढणार, असा टोला पेडणेकर यांनी राणे कुटुंबीयांना लगावला.
आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. टार्गेट करणारे दुसरे आहेत. पण आमच्याच काट्याने काटा काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळणार नाही. मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करायची असेल तर त्यांनी खुशाल करावी. पण हे विसरू नये की, २५ मधील २० वर्ष ते आमच्या सोबतच होते. स्थायी समितीमध्ये भ्रष्टाचार होतो, असं ते म्हणतात मग यशवंत जाधवांना सोबत का घेतले, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला.
शिवसेनेची मंगळागौर, किशोरी पेडणेकरांनीही सहभागी होत आनंद लुटला
नितेश राणेंचं महापालिका आयुक्तांना पत्र
भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहिलं आहे. प्रशासक या नात्याने आपल्यावर पालिकेची भ्रष्टाचारी ओळख पुसण्याची जबाबदारी आहे याची आठवण नितेश राणे यांनी आयुक्तांना करुन दिली आहे. महापालिकेचे प्रशासक म्हणून आपले अधिकार हे केवळ बदली करता मर्यादित नसून अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मुभा देतात. नेहमीप्रमाणे दुर्घटना आणि जिवीतहानी झाल्यानंतर मुंबई प्रशासनाला जाग येते हा समज दुर करणे हे प्रशासक म्हणून आपल्याकडून अपेक्षित आहे, असे नितेश राणे यांनी पत्रात म्हटले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.