पोलीस आयुक्तांच्या नावानं अज्ञात व्यक्ती​ गिफ्टची मागणी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हॉट्स ऍपच्या माध्यमातून गिफ्ट मागण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी मुंबई पोलीस कारवाई करत आहेत.

 

mumbai police
विवेक फणसाळकर
मुंबई: पोलीस आयुक्तांच्या नावानं अज्ञात व्यक्ती गिफ्टची मागणी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हॉट्स ऍपच्या माध्यमातून गिफ्ट मागण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी मुंबई पोलीस कारवाई करत आहेत. पोलीस आयुक्तांचा गणवेशातील फोटो डीपी असलेल्या व्हॉट्स नंबरवरून गिफ्टची मागणी झाल्यास त्याला प्रतिसाद देऊ नका, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचा गणवेशातील डीपी असलेल्या नंबरवरून ‘ऍमेझॉन पे ई गिफ्ट विथ १००००’ची मागणी केली जात आहे. लवकरात लवकर गिफ्ट देण्याची विनंती अनोळखी इसम करत आहे. ९३२९६०३२९४ या नंबरवरून गिफ्ट्सची मागणी केली जात आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. यासंदर्भात कायदेशीर कारवाई सुरू आहे.
नाशिकच्या लाचखोर अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; नोटा मोजायला मशीन मागवाव्या लागल्या
बोगस मेसेजमध्ये नेमकं काय?
मी सध्या अतिशय महत्त्वाच्या बैठकांमध्ये अडकलो आहे. मला तातडीनं मदत हवी आहे. सध्या माझ्याकडे कोणतंही कार्ड नाही. तुम्ही किती वेळात या गिफ्ट कार्ड्सची व्यवस्था करू शकता? मला ती तासाभरात पाठवायची आहेत. मी दिवस संपायच्या आत तुम्हाला त्याचे पैसे परत करेन, अशा स्वरुपाचे बोगस मेसेज अनेकांना केले जात आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here