पणजी: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोनाली फोगाट यांचे पीए सुधीर सांगवान यांनी गुन्हा कबूल केल्याचा दावा गोवा पोलिसांनी केला आहे. फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणी गोवा पोलिसांनी त्यांचा सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंहला अटक केली आहे. सांगवाननं गुन्हा कबूल केल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंह बिश्नोई यांनी दिली.

गोव्याला पोहोचल्यानंतर सोनाली फोगाट सुखविंदर सोबत उत्तर गोव्यातल्या कर्ली येथील रेस्टॉरंटमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी सांगवान यांनी फोगाट यांच्या पिण्याच्या पाण्यात काहीतरी मिसळलं आणि ते पाणी त्यांना पिण्यास भाग पाडलं, असं बिश्नोई यांनी सांगितलं. पाणी प्यायल्यानंतर फोगाट यांनी अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर सांगवान आणि सुखविंदर फोगाट यांना त्यांचा मुक्काम असलेल्या हॉटेलमध्ये घेऊन गेले, अशी माहिती पोलीस महानिरीक्षकांनी दिली.
तोल सावरेना, सुधीरने पकडून नेले, सोनाली फोगाट यांच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं, VIDEO पुढे
हॉटेलमधून फोगाट यांना सेंट अँटनी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. सोनाली यांचे पीए सांगवान यांनी सुखविंदरच्या मदतीनं त्यांची हत्या केल्याचा आरोप फोगाट यांचा भाऊ रिंकू ढाका यांनी केला होता. सोनाली यांची राजकीय कारकिर्द संपवण्याच्या आणि त्यांच्या संपत्तीवर ताबा घेण्याच्या उद्देशानं ही हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप रिंकू यांनी केला होता.

सोनाली फोगाट यांच्या हत्या प्रकरणाची प्रत्येक बाजू तपासून पाहिली जात असल्याचं बिश्नोई यांनी सांगितलं. तपास अधिकाऱ्यांनी संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. सुधीरनं सोनालीला जबरदस्तीनं काहीतरी प्यायला दिलं, असं तपासातून समोर आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here