रायगड: ‘अम्फान चक्रीवादळात झालेल्या नुकसानासाठी पश्चिम बंगालला केंद्रानं पॅकेज दिलं ते चांगलंच झालं. त्या ठिकाणी १८ जिल्ह्यांचं नुकसान झालं आहे. आम्ही जेव्हा मदतीच्या मागणीसाठी येऊ तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्याबाबतही तसाच प्रेमाचा दृष्टीकोन ठेवावा,’ अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी व्यक्त केली आहे.

वाचा:

निसर्ग चक्रीवादळामुळं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार सध्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी रायगडमधील अनेक गावे व बाजारपेठांना भेटी दिल्या. तेथील स्थानिकांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यानंतर पत्रकारांशीही संवाद साधला. वादळ ही नैसर्गिक आपत्ती असल्यामुळं साहजिकच केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा केली जात आहे. त्याबाबत पवारांना विचारलं असता ते म्हणाले, ‘हे महाराष्ट्रावरचे संकट आहे. आता केंद्र आणि राज्य सरकारची जबाबदारी पाहण्याची वेळ नाही. एकत्र येऊन संकटावर मात करण्याची ही वेळ आहे.’

‘काही वर्षांपूर्वी जालना व इतर ठिकाणी मोसंबी पीकाचे नुकसान झाले असता तेथील फळ बागायतदारांना केंद्र सरकारकडून योग्य मदत मिळवून देण्यात आली होती. या भागात देखील असा प्रयत्न करता येईल का याचा निश्चितच विचार केला जाईल. कोकणातील वस्तुस्थिती केंद्र सरकारपुढं मांडली जाईल,’ असं ते म्हणाले.

आमच्याकडं विदुषकाची कमी आहे!

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. ‘तीन पक्षांचे हे सरकार म्हणजे सर्कस आहे. या सरकारला विकासाची कुठलीही व्हिजन नाही असं राजनाथ म्हणाले होते. राजनाथ यांच्या या टीकेबद्दल विचारलं असता पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीत त्यांना कोपरखळी मारली. ‘आमच्या सर्कशीमध्ये प्राणी आहेत. पण सर्कशीत विदुषकाचीही एक योजना असेत. त्या विदुषकाची आमच्याकडं कमी आहे,’ असा टोला त्यांनी हाणला.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here