शिवसेनेला ४ आठवड्यांचा वेळ
केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेनेची विनंती मान्य करत ४ आठवड्यांची वेळ वाढवून देण्यात आली आहे. शिवसेनेनं २३ ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाकडे मुदतवाढ मागितली होती. निवडणूक आयोगानं सेनेची ही विनंती मान्य केली आहे. शिवसेनेनं यापूर्वी देखील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ४ आठवड्यांची मुदतवाढ मागितली होती. त्यावेळी निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरेंच्या गटाला २ आठवड्यांची वेळ दिली होती. ही मुदत २२ ऑगस्टला संपली होती.
२३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
शिवसेनेला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कागदपत्रं सादर करण्यासाठी ४ आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. एकीकडे सुप्रीम कोर्टातील सुनावणी आणि घटनापीठाची तारीख लांबणीवर पडली आहे. तर दुसरीकडे २३ ऑगस्टला शिवसेनेनं चार आठवड्यांची वेळ मागितली होती. केंद्रीय निवडणूक आयोगानं विनंती मान्य केल्यानं २३ सप्टेंबर पर्यंत नवी मुदत शिवसेनेला मुदत मिळाली आहे.
सुप्रीम कोर्टातील सुनावणी प्रलंबित आहे त्याचवेळी केंद्रीय निवडणूक आयोगाला कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. जर, सुप्रीम कोर्टातील सुनावणी झाल्यास केंद्रीय निवडणूक आयोग देखील एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या अर्जावर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु करता येऊ शकते.