मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी सभागृहात देखील आग्रही असलेले भास्कर जाधव यांनी हा प्रश्न सुटावा यासाठी सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेऊन भाजप मंत्र्यांचे परशुराम घाटात स्वागत केले. इतकेच नाही तर या प्रश्नावर थेट चर्चा करता यावी यासाठी त्यांनी मतभेद बाजुला ठेवत परशूराम बस स्टॉप ते गेस्ट हाऊस असा एकत्र प्रवासही केल्याचे पाहायला मिळाले.
रत्नागिरी जिल्हयातील शिवसेनेचे जे दोन आमदार सद्यस्थितीत उद्धव ठाकरे गटात आहेत त्यापैकी भास्कर जाधव आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. कोकणातील हा महामार्ग अत्यंत महत्वाचा व संवेदनशील विषय झाला आहे.यासाठी भास्कर जाधव यांनी नेहमीच प्रशासनातील अधिकारी
व ठेकेदार यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
दाजींचा नाद खुळा, पुढे ताफा आणि मागे दानवेंचा मालकीणबाईंसोबत दुचाकीवर फेरफटका
गणेशोत्सवाच्या तोंडावर असताना किमान या मार्गावरील खड्डे भरले जावेत अशी प्रमुख मागणी आहे.पण एकंदरीत असलेली या मार्गाची दुरवस्था,धोकादायक झालेला परशुराम घाट या सगळ्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी व हे काम सुरळीत मार्गी लागावे यासाठी आढावा घेऊन आवश्यक निर्णय घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण दौऱ्यावर आले होते. यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी या कोकणातील महामार्गाची परिस्थिती कथन केली. मात्र, यामध्ये काही राजकीय चर्चा झाली का किंवा काय? याबाबत मात्र समजू शकलेले नाही.पण दोन्ही नेत्यांचा एकाच गाडीतील प्रवास मात्र चर्चेत आला आहे.