पुणे : तळेगाव दाभाडे येथे अनैतिक संबंधातून एका महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. महिलेने लग्नाचा तगादा लावल्याने ही हत्या झाली होती. आता या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. महिलेने लग्नाचा तगादा लावल्यानेच संबंधित आरोपीने सुपारी देऊन ही हत्या केली असल्याचं समोर आलं आहे. याबाबत पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. पिंपरीच्या गुन्हे शाखा ५च्या युनिटने ही कारवाई केली आहे.

बजरंग मुरली तापडे( वय ४५), पांडुरंग उर्फ सागर बन्सी हारके ( वय ३५), सचिन प्रभाकर थिगळे (वय ३०), सदानंद रामदास तुपक (वय २६) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

‘जीवन हे सुंदर आहे, पण…’; सुसाईड नोट लिहून कॉलेजच्या विद्यार्थिनीने हॉस्टेलमध्येच आयुष्य संपवलं!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचे आरोपी बजरंग तापडे याच्यासोबत अनैतिक संबंध होते. आपण लग्न करू असा तगादा महिलेने बजरंग यांच्याकडे लावला होता. मात्र, बजरंग हा अगोदरच विवाहित होता. त्याला तीन मुले देखील आहेत. मात्र, महिला हे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. आरोपी बजरंग याला या सततच्या बोलण्याचा त्रास होत होता. शेवटी त्याने संबंधित महिलेच्या हत्येची सात लाखांची सुपारी पांडुरंग हारके याला दिली. त्यातले चार लाख ऍडव्हान्स देखील बजरंग याने दिले होते.

त्यानुसार पांडुरंग हारके याने सचिन थिगळे याला काही रक्कम देत महिलेच्या येण्याजण्याचा मार्ग दाखवला. तसेच बाकीच्या दोन साथीदारांनी तिची रेकी देखील केली होती. मात्र, ९ ऑगस्टच्या सकाळी ती दुचाकीवरून जात असताना तिची गाडी अडवून तिचा गळा चिरून हत्या केली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी योग्य तपास करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

सरकार पडले, ते बरे झाले, अडीच वर्ष फक्त पैसे खात होते; काँग्रेसच्या कार्यकारिणीत नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here