या बेअरिंग कंपनी स्टॉकने दोन वर्षांत गुंतवणूकदारांना दिले २८५% रिटर्नया बेअरिंग कंपनी स्टॉकने दोन वर्षांत गुंतवणूकदारांना दिले २८५% रिटर्न
३ वेळा स्प्लिट
टीसीएसचा शेअर्स सूचीबद्ध झाल्यापासून तीन वेळा (२००६, २००९ आणि २०१८) १/२ मध्ये स्प्लिट झाला आहे. गुंतवणूकदाराने त्यावेळी १० शेअर्स घेतले होते त्यांचे आता ८० शेअर्स झाले आहेत.
दिवाळीपर्यंत निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये तेजीची शक्यता? ‘हे’ ३ घटक ठरतील महत्वाचे
कंपनीचा आवाका
बाजार भांडवलानुसार टीसीएस ही भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. ६ लाख कर्मचारी असलेली ही जगातील एक मोठी आयटी कंपनी आहे. कंपनीचे ९३ टक्के कर्मचारी भारतीय वंशाचे आहेत. टाटा समूहाने नियुक्त केलेल्या एकूण कर्मचार्यांपैकी सुमारे ५७ टक्के कर्मचारी TCS चे आहेत. TCS ही १९८० मध्ये भारतात सॉफ्टवेअर संशोधन आणि विकास केंद्र उघडणारी पहिली कंपनी होती. सध्या TCS ४६ देशांमध्ये १४९ ठिकाणी कार्यरत आहे.
५५ टक्के वाटा
टाटा समूहाच्या एकूण बाजार भांडवलात टीसीएसचा वाटा 55 टक्के आहे. तर नफ्यात एकूण वाटा निम्मा आहे. टीसीएस ही देशातील दुसरी सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी आहे. निफ्टी-५० च्या एकूण नफ्यात कंपनीचा वाटा १० टक्के आहे. टीसीएसचे सध्याचे बाजार भांडवल सुमारे १२ लाख कोटी रुपये आहे जे Infosys, Wipro, HCL Tech आणि Tech Mahindra च्या एकूण बाजार भांडवलाच्या बरोबरीचे आहे.
कंपनी मार्केट कॅप
टीसीएस – १२ लाख कोटी
इन्फोसिस – ६.४६ लाख कोटी
विप्रो – २.२८ लाख कोटी
एचसीएल टेक – २.५८ लाख कोटी
टेक महिंद्रा – १.०४ लाख कोटी