मुंबई: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या निष्ठावान नेत्यांविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. शिंदे गटातील प्रताप सरनाईक, भावना गवळी, यामिनी जाधव यांच्याविरोधात नरमाईची भूमिका घेणाऱ्या सोमय्यांनी माजी मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. परब यांच्याशी संबंधित कथित रिसॉर्ट पाडण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. त्यानंतर आता सोमय्या दापोलीला रवाना झाले आहेत. मांडवी एक्स्प्रेसमधून सध्या सोमय्या प्रवास करत आहेत.

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांनी शहाणपणा दाखवला. त्यांनी दापोलीतल्या मुरुड येथील त्यांचा बंगला आधीच जमीनदोस्त केला. मात्र अनिल परब गाढव आहे, अशा शब्दांत सोमय्यांनी घणाघाती टीका केली. ठाकरे सरकारमधले अधिकारी विकले जाऊ शकतात. मात्र किरीट सोमय्या, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस विकले जाणार नाहीत, असं सोमय्या म्हणाले.
करुणा मुंडे यांची संगमनेरमध्ये ३० लाख रुपयांची फसवणूक; आरोपी धनंजय यांच्या ओळखीचे असल्याचा आरोप
सरकारकडून रिसॉर्ट पाडण्याचे आदेश आले आहेत. त्यामुळे रिसॉर्टवर तोडक कारवाई होणारच. मात्र या रिसॉर्टसाठी पैसे कुठून आले याचा हिशोब परब यांना द्यावाच लागेल, असा पुनरुच्चार सोमय्या यांनी केला. परब यांनी सीआरझेड नियमांचं उल्लंघन करून रिसॉर्ट उभारल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे केला होता.

सोमय्या सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी ठाण्याहून खेडला रवाना झाले. दुपारी बावणे बाराच्या सुमारास त्यांचं खेड रेल्वे स्थानकात आगमन होईल. तिथून ते दापोलीला रवाना होतील. मुरुड ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या साई रिसॉर्टला सोमय्या भेट देणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत अधिकारीदेखील असण्याची शक्यता आहे. सोमय्या काही पोलीस अधिकाऱ्यांचीही भेट घेतील.
शिंदे गटाच्या आमदारांच्या नावापुढे आता वंशपरंपरेने नवी उपाधी लागणार; शिवसेनेकडून खरपूस समाचार
अनिल परब आहेत कुठे?
साई रिसॉर्टशी आपला कुठलाच संबंध नसल्याचा दावा परब यांनी केला आहे. मात्र सोमय्यांनी यासंदर्भातील कागदपत्रं आणि तपशील केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनिल परब प्रसारमाध्यमांसमोर आलेले नाहीत. ते त्यांच्या मुंबईतील घरीही नाहीत. परब सध्या अज्ञातवासात असल्याचं बोललं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here