म. टा. प्रतिनिधी, मुंबईः मुंबई-कोकण मार्गावरील लोकप्रिय रेल्वेगाडी असलेल्या ‘तुतारी एक्स्प्रेस’ने प्रवास करणाऱ्यांसाठी शुभवार्ता आहे. आज, २७ ऑगस्टपासून १२ सप्टेंबरपर्यंत या गाडीला पाच अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. यामुळे १९ डब्यांची ‘तुतारी’ आता २४ डब्यांसह धावणार आहे.

गाडी क्रमांक ११००३/४ दादर-सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस ही मुंबई-कोकण मार्गावर रोज धावते. एका रात्रीत मुंबईतून कोकणात पोहोचवत असल्याने या गाडीला प्रवाशांची विशेष पसंती आहे. परिणामी या गाडीच्या प्रतीक्षायादीतील संख्याही नेहमीच जास्त असते.

उत्सवकाळात प्रवाशांच्या सुविधेसाठी एक वातानुकूलित ३ टियर, दोन शयनयान आणि दोन बैठे आसन असलेले असे एकूण पाच डबे जोडले जाणार आहेत. गणेशोत्सव काळातील गर्दी लक्षात घेता गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी गाडी सुटण्याच्या ३० मिनिटे आधी रेल्वे स्थानकात उपस्थित राहावे, असे आवाहन रेल्वे अधिकाऱ्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here