बुमराहच्या अनुपस्थितीत भुवनेश्वरची जबाबदारी वाढली
भारतीय संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमारची जबाबदारी वाढलेली असेल. पहिल्या षटकात फलंदाज आक्रमक खेळत असो किंवा शेवटच्या षटकांमध्ये धावा रोखणे असो. दोन्ही बाबतीत भुवनेश्वरला कोणीही हारवू शकत नाही.

हार्दिक पांड्या गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये आक्रमक दिसेल
हार्दिक एक दमदार फलंदाज आहे. पण गोलंदाजी हा त्याच्या खेळाचा यूएसपी आहे. दुखापतीमुळे बराच काळ तो गोलंदाजी करू शकला नाही. मात्र, आता त्याने गोलंदाजीला पु्न्हा सुरूवात केली आहे. तो आधीपेक्षा जास्त आक्रमक खेळताना दिसत आहे.

रवींद्र जडेजा करेल आपल्या तुफान गोलंदाजीचे दर्शन
रवींद्र जडेजा हा एक उत्तम डावखुरा फिरकी गोलंदाज. वेगवान षटके टाकणे ही त्याची गुणवत्ता आहे. जडेजासाठी खेळपट्टी चांगली मिळाली तर फलंदाजांचं काही खरं नाही. जडेजा हा मैदानावर नेहमीच आत्मविश्वासात दिसतो, त्याचा हाच विश्वास पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात महत्त्वाचा ठरू शकतो.

युझवेंद्र चहल आपल्या फिरकीत विरोधकांना अडकण्यासाठी सज्ज
उत्तम फिरकीपटू युझवेंद्र चहल हा पाकिस्तानविरुद्धच्या मागील सामन्यात खेळला नाही. कारण त्याला विश्वचषकासाठी भारताच्या संघात स्थान देण्यात आले नव्हते. पण हा आक्रमक फिरकी गोलंदाज यावेळी पाकिस्तानविरुद्ध भारतासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो.

डावखुरा अर्शदीप सिंग चमत्कार करेल
भारतीय गोलंदाजीतील सर्वात कमी अनुभवी गोलंदाज, पण शेवटच्या षटकांमध्ये अर्शदीप पाकिस्तानी फलंदाजांसाठी सर्वात मोठे आव्हान ठरू शकतो. त्याने आयपीएलमधील दबावाने भरलेल्या सामन्यांमध्ये अनेक बड्या फलंदाजांना धावा करण्यापासून रोखले आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती तो उद्याच्या सामन्यात करू शकतो.
