मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येचे कारण ऐकून घरातील सगळेच हादरले आहेत. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. बैलपोळ्याचा सण साजरा करत असतानाच कुटुंबीयांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

हायलाइट्स:
- दारुच्या नशेत शिवीगाळ केल्यावरून वाद
- चाळीसगाव तालुक्यातील अभोणे गावातील घटना
चाळीसगाव तालुक्यातील अभोणे गावात बैल पोळा सण उत्साह साजरा करत असताना दुसरीकडे अवघ्या तालुक्याला हादरवणारी घटना घडली आहे. मोठा भाऊ पिंटू तुकाराम पाटील (३८) व लहानभाऊ शिवाजी तुकाराम पाटील (३२) हे घरी बैल पूजनासाठी आले होते. लहान भाऊ शिवाजी पाटील याने दारूच्या नशेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, लहानभाऊ शिवाजी पाटील याने मोठ्या भावाच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह इच्छा व्यक्त केली. त्यामुळे दोघांमध्ये मोठा वाद झाला. यानंतर वादाचे परिवर्तन हाणामारीत झाले.
वाचाः चाकरमान्यांना गपणती बाप्पा पावला! कोकणातील गणेशभक्तांसाठी गुड न्यूज
दारापुढे बैल पूजनाची तयारी सुरू असताना हा वाद सुरू होता. जवळच बैल पूजनासाठी लोखंडी पास ठेवण्यात आली होती. मोठा भाऊ पिंटू तीच पास घेऊन लहान भाऊ शिवाजी यांच्या डोक्यावर तीन वार केले. डोक्यावर जोरदार प्रहार झाल्यामुळे लहान भाऊ शिवाजी जागीच गतप्राण झाले. त्याला तात्काळ चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले.
वाचाः बेनामी देणग्याचा ‘आधार’; आठ राष्ट्रीय पक्षांना अज्ञातांकडून १५ हजार कोटींचा निधी
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.