Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Aug 27, 2022, 12:17 PM
Today Maharashtra Crime News : आरोपीला फुलंब्री पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर सुटका करण्यात आलेल्या चिमुकल्याला काकांच्या स्वाधीन केले. आरोपीने मुलाचे अपहरण कशासाठी केले होते. याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

हायलाइट्स:
- अपहरण केलेल्या सहा वर्षीय मुलाची सुटका
- लॉज चालकाच्या सतर्कतेने मुलाची सुटका
- औंढा पोलिसांनी केली सुखरूप सुटका
आरोपीने औरंगाबादमधील फुलंब्री येथून चिमुकल्याचे अपहरण केले. त्यानंतर आरोपी चिमुकल्याला घेऊन विविध ठिकाणी फिरला. दुपारच्या सुमारास आरोपी दिनेश कुलकर्णी हा हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील श्रीकृपा नावाच्या लॉजवर आला. त्याने तिथे एक रून बुक केली. मात्र, लॉज चालकाला त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी तात्काळ औंढा नागनाथ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी एपीआय अनिल लांडगे, रवी इंगोले, बीट जमादार संदीप टाक, गणेश गायकवाड लॉजमालक मनोज जवळेकर यांना सोबत घेत सापळा रचून आरोपीशी संवाद साधला.
अधिक चौकशीनंतर हाडबडलेल्या आरोपीला पोलीस ठाण्यात आणले. यानंतर पोलीस खाक्या दाखवताच त्याने धक्कादायक प्रकार सांगितला. आरोपी स्वतःबरोबर मुलावर विष प्रयोग करणार होता. अशी आरोपीने स्वतः कबुली दिली. फुलंब्री येथील मुलाचे नातेवाईक काका, मामा मावशी औंढा पोलीस ठाण्यात हजर झाले. यानंतर पोलिसांनी त्या बालकाला त्यांच्याकडे स्वाधीन केले यावेळी सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.