भंडारा : सासरच्या लोकांकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याने गळफास घेऊन विवाहीतेने आत्महत्या केल्याची घटना भंडारा शहर पोलीस स्टेशन हद्दित घडली आहे. पल्लवी प्रविण लांजेवार वय ३४ असे मृतक विवाहितेचे नाव असून पोलिसांनी सासरच्या लोकं विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. यात पवनी येथील राष्ट्रवादी काँग्रेस नेता लोमेष वैद्यचा पण समावेश आहे.

नागपूर येथील राहणारा पल्लवीचे लग्न राजेंद्र नगर भंडारा येथील राहणार्‍या प्रविण लांजेवार सोबत २०१५ साली झाले. लग्नानंतर काही महिन्यातच तिच्या सासरच्या लोकांनी तिचा मानसिक वा शारीरिक छळ सुरू केला. याला त्रासून दोन्ही पक्षाने काडीमोडचा निर्णय घेत २०१९ या वर्षी काडीमोड करून दिले. परंतु, प्रविण हा तिच्या माघारी राहिला आणि माफी मागत पुन्हा २०२१ या वर्षी नोंदणीकृत रित्या लग्न करून नांदू लागले.

VIDEO : छतावर चढलेला सर्जा थेट ५० फूट खाली कोसळला, पोळ्याचा VIDEO पाहून काळजाचा थरकाप उडेल
काही दिवसातच तिच्या सासू-सासरे, नंद आणि नवर्‍याने तिचा पुन्हा छळ सुरू केला. या जाचाला त्रासून तिने शुक्रवार सायंकाळी गळफास लावून जीवन संपवले. याबाबत माहेरकडील लोकांच्या तक्रारीवरून भंडारा शहर पोलिसात सासरकडील मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींमध्ये पवनी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता लोमेष वैद्य याचा समावेश असून ते मृताचे नंतरचा पती आहे. पुढील तपास भंडारा पोलीस तपास करत असल्याची माहिती आहे.

मुंबई हादरली! अंधेरीत बॅगेत सापडला १५ वर्षीय तरुणीचा मृतदेह, शरीरावर असंख्य खुणा, घडलं तरी काय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here