रत्नागिरी :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत बंड केलं. शिंदे यांनी पक्षाचे तब्बल ४० आमदार आणि बहुतांश खासदार आपल्या गटात सामील करून घेत ठाकरे यांना धक्का दिला. शिवसेनेचे १५ आमदार निष्ठेने उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे राहिले होते. मात्र हे आमदारही त्यांची साथ सोडणार का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी गटनेतेपदावर नियुक्ती केलेल्या राजन साळवी यांनी भाजप नेते आणि मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली आहे. त्यामुळे साळवी हेदेखील शिंदे गटात दाखल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. मात्र राजन साळवी यांनी स्पष्टीकरण देत या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

‘मी मरेपर्यंत शिवसैनिक, माझ्यावर पक्षप्रमुखांचा विश्वास आहे. मी मुंबई-गोवा महामार्गाबाबत मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली. मंत्र्यांची भेट घेऊ नये का? काय चुकीचं केलं का मी? मी कुठेही जाण्याचा प्रश्नच येत नाही. याआधीही जेव्हा याबाबत बातमी प्रसारित झाली होती त्यावर मी माझी भूमिका स्पष्ट केली होती,’ असं साळवी यांनी म्हटलं आहे.

सेनेच्या दसऱ्या मेळाव्याचं काय होणार? शिंदे गट इव्हेंट हायजॅक करणार? उदय सामंत स्पष्टच बोलले

राजन साळवी यांच्याबाबत का होत आहे चर्चा?

कोकणातील रिफायनरी प्रकल्पासाठी आमदार राजन साळवी हे अनुकूल आहेत, तर शिवसेना खासदार विनायक राऊत हे कायम प्रकल्पविरोधी मत मांडत आले आहेत. याच मुद्दयावरून साळवी हे शिंदे गटात सामील होतील, असं बोललं जात आहे. असं झाल्यास हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे. आज पुन्हा राजन साळवी आणि रविंद्र चव्हाण ही भेट झाल्याने येत्या काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here