भारतीय संघ पहिल्यांदाच ‘पाम जुमेराह’ रिसॉर्टमध्ये थांबलेला नाही. गेल्या वर्षी झालेल्या T-20 विश्वचषकादरम्यानही भारतीय खेळाडू ‘पाम जुमेराह’ रिसॉर्टमध्ये थांबले होते. ‘पाम जुमेराह’ची गणना जगातील आलिशान हॉटेल्समध्ये केली जाते. हॉटेलमध्ये तुम्ही सर्व आधुनिक सुविधांचा आनंद घेऊ शकता.
१६२ खोल्यांच्या ‘पाम जुमेराह’च्या आत अनेक दुकाने आहेत जिथे तुम्ही काहीही खरेदी करू शकता. हॉटेलमध्ये एक प्रेक्षणीय व्ह्यू पॉईंट आहे जिथून संपूर्ण दुबई शहराचे दृश्य दिसते. विशेष म्हणजे या हॉटेलचा स्वतःचा समुद्रकिनारा देखील आहे जो त्याच्या समोरच आहे. हॉटेलमध्ये स्विमिंग पूल, वॉटर स्पोर्ट्स, व्हीआयपी कबाना, मैदानी मनोरंजन क्षेत्र यासह अनेक सुविधा आहेत.
एका दिवसाचे भाडे किती?
हॉटेलमध्ये 3D आणि 4DX थिएटर देखील आहेत. हॉटेलमध्ये अनेक रेस्टॉरंट्स आहेत जिथे तुम्हाला भारतीय ते वेस्टर्न, कॉन्टिनेन्टल आणि खूप प्रकारचे डिशेस मिळतात. एक स्पा देखील आहे जिथे मसाजपासून बर्फ बाथपर्यंत सुविधा आहे. या हॉटेलमध्ये एका दिवसाच्या मुक्कामाचे किमान भाडे ३० हजार रुपये असून सीझनमध्ये ते ५० ते ८० हजार रुपयांपर्यंत जाते.
आशिया चषकात सहा संघ सहभागी होत आहेत
११ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत श्रीलंका, भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान व्यतिरिक्त हाँगकाँगचा संघ सहभागी होत आहे. चार देशांच्या क्वालिफायर स्पर्धेत अव्वल स्थान मिळवून हाँगकाँगने आशिया चषक स्पर्धेचे तिकीट निश्चित केले. हाँगकाँगने यापूर्वी देखील आशिया कपमध्ये सहभाग घेतला आहे.