जळगाव : राज्याच्या राजकारणात सध्या एका घोषणेनं चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ‘५० खोके, एकदम ओके’ अशी घोषणाबाजी करत महाविकास आघाडीतील आमदारांनी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला. या घोषणांनी घायाळ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून पलटवार करण्याचा प्रयत्न आला. मात्र आता याच घोषणेवरून राष्ट्रवादी राज्यभरात रान उठवण्याची शक्यता निर्माण झाली असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीतच पदाधिकाऱ्यांनी याबाबत मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र भैय्या पाटील, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यासह सर्व माजी आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याचं दार त्याचं दार, बाई माझ्या तोंडात मार, नवनीत राणांचा सुषमा अंधारेंकडून समाचार

पदाधिकाऱ्यांची मागणी आणि जयंत पाटलांचा प्रतिसाद

‘५० खोके, एकदम ओके’ अशा आशयाचे टी शर्ट छापून त्याचे प्रत्येक मतदारसंघात वाटप करण्यात यावं, अशा सूचना राष्ट्रवादीच्या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या. या सूचनांचं जयंत पाटील यांनी कौतुक करत अशा पद्धतीनेच स्थानिक पातळीवर रान पेटवायला सुरुवात केली पाहिजे, असं आवाहन केलं आहे. तसंच आजी-माजी सर्व लोकप्रतिनिधी एकत्र आले तर राज्याचं चित्र बदलू शकतं, असंही जयंत पाटील म्हणाले.

कोकणात उद्धव ठाकरेंना धक्का? राजन साळवींनी घेतली भाजप मंत्र्याची भेट; स्पष्टीकरण दिलं, मात्र…

दरम्यान, अशा पद्धतीने आगामी काळात निवडणुकांना सामोरे गेल्यास आज व्यासपीठावर जे नऊ माजी आमदार उपस्थित आहेत, त्यांच्याकडे बोट दाखवत ते आजी आमदार होतील. सर्वच्या सर्व ठिकाणी जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार विजयी होतील, असा विश्वास यावेळी राष्ट्रवादीच्या डॉ. सतीश पाटील यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here