अनेक वेळा मुख्य रस्त्यावर ठाण मांडून बसणारी, फिरणारी मोकाट जनावरं आपण पाहतो. मात्र काही दिवसांनी ही मोकाट जनावरं कुठे गायब होतात हे कोणाच्याही लक्षात येत नाही. लातूर शहरातील गंजगोलाईत असणाऱ्या दुकानासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा एक धक्कादायक प्रकार कैद झाला.

पोलीस प्रशासन कधी सतर्क होणार?
लातूर जिल्ह्यातील गस्तीवरील पोलिसांनी नुकतीच एक मोकाट जनावरांची तस्करी करणारी आंतरराज्य टोळी ताब्यात घेतली होती. या टोळीचा पोलिसांनी सिनेस्टाईलने रात्रभर पाठलाग केला होता. ही कारवाई काही दिवसांपूर्वीच झाली होती. त्यामुळे अशा प्रकारे मोकाट जनावरांची चोरी करणाऱ्यांना जरब बसेल असे वाटत असतानाच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही धक्कादायक घटना कैद झाली आहे.त्यामुळे या दोन घटना पाहता पोलीस प्रशासन कधी सतर्क होणार आणि आता यावर काय कारवाई करणार हे पाहणेही तितकेच महत्वाचं ठरणार आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.