मुंबई : मालिकांमध्ये साजरे होणारे सणवार प्रेक्षकांना आवडतात. श्रावणात तर अनेक मालिकांनी मंगळागौरीचे खेळ दाखवले. ही रंगत अजून संपलेली नाही. जीव माझा गुंतला मालिकेत अंतराची मंगळागौर साजरी होणार आहे. खानविलकरांच्या घरामध्ये मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी होणार आहे अंतराची पहिली मंगळागौर.

फेसबुक पोस्टमुळे ट्रोल झालेली केतकी चितळे, आता सोशल मीडियावरच होतंय कौतुक

श्रावण सुरू झाल्यावर येणारे श्रावणी सोमवार, रक्षाबंधन, महादेवाची पूजा पण त्यातही मंगळागौर म्हटलं की, महिलांचा विशेष उत्साह दिसून येतो. कारण त्यांच्यासाठी मंगळागौर म्हणजे अत्यंत जवळचा विषय. जीव माझा गुंतला मालिकेत खानविलकर घरामध्ये मोठ्या उत्साहात अंतराच्या पहिल्या मंगळागौरीची तयारी केली आहे.

अंतराने निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे, साजेसे असे दागदागिने देखील परिधान केले आहेत. सगळ्याच महिलांनी पारंपरिक नऊवारी साडी नेसली आहे. अंतरासोबतच चित्रा काकी, श्वेता, आजी, सुहासिनी आणि इतर महिला देखील अतिशय सुंदर तयार झाल्या आहेत आणि मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसणार आहे. पारंपरिकरित्या मंगळागौरीची पूजा देखील होणार आहे. जीव माझा गुंतला मालिकेचा मंगळागौर विशेष भाग २९ आणि ३० ऑगस्टला रात्री ८.३० वाजता कलर्स मराठीवर पाहता येईल.

जीव माझा गुंतला

अंतरा आणि मल्हारच्या विरोधात बरीच कटकारस्थानं आतापर्यंत चित्रा काकी, काका आणि श्वेता मिळून रचत आले. पण आता मात्र यांच्या आयुष्यात मेघ हे नवं संकट पुढ्यात येऊन ठाकलं आहे. चित्रा काकी आणि मेघ मिळून आता नवीन प्लॅनिंग करणार आहेत. अंतरा आणि मल्हारमध्ये दुरावा आणणं हेच त्यांचं आता लक्ष्य आहे. मेघची भूमिका साकारतोय बिपिन सुर्वे. मंगळागौरीचा एपिसोड संपल्यानंतर प्रेक्षकांसाठी बऱ्याच उत्कंठावर्धक गोष्टी मालिकेत असतील.

अरुंधतीला सुलेखाताई देतात गुंतवणुकीचा मोलाचा सल्ला, हा Video सगळ्यांसाठीच

शिवसेनेची मंगळागौर, किशोरी पेडणेकरांनीही सहभागी होत आनंद लुटला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here