अहमदनगर : शिर्डी येथील साई समाधी मंदिरात हार-फुले नेण्यास गेल्या दहा महिन्यांपासून बंदी करण्यात आली असून या निर्णयाला फुले विक्रेत्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. इतकेच नाही, तर साई मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक आणि फुले विक्रेत्यांमध्ये झटापट झाल्याने या मुद्द्याने गंभीर स्वरूप धारण केले होते. विषयाचे गांभिर्य लक्षात घेत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठक आयोजित करत गावकरी, विक्रेते आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली. चर्चेअंती या विषयावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती आपला अहवाल एका महिन्याने देणार आहे. हे पाहता या मुद्द्यावरील निर्णय तूर्तास लांबणीवर पडल्याचे स्पष्ट होत आहे. (A committee has been set up to decide on taking flowers and garlands to the Sai temple in Shirdi)

आजच्या बैठकीत स्थापन करण्यात आलेल्या समितीत जिल्हाधिकाऱ्यांसह, साईमंदिर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा पोलीस प्रमुख यांचा समावेश करण्यात आला आहे. साई मंदिरात फुले आणि हार नेण्यासंदर्भात ही समिती पाहणी करून महिन्याभरात आपला अहवाल सादर करणार आहे.

साईबाबा दरिद्रीनारायणाचे होते, हे विसरू नका, हार-फुले बंदीवरून टीका
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज फुल विक्रेत्यांच्या प्रश्नावर बैठक आयोजित केल्याने आज निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, समितीच्या अहवालावर निर्णय येण्यास महिन्याभराचा कालावधी लागणार असल्याने हा निर्णय आता कमीतकमी महिन्याभरासाठी तरी लांबणीवर पडला आहे.

शिर्डीत साई मंदिराच्या गेटवर तुफान राडा; हार, फुलं विक्रेत्यांची घोषणाबाजी, सुरक्षा रक्षकांशी झटापट
फुले विक्रेत्यांच्या प्रश्नावर काल साई मंदिरात्या विश्वस्तांची बैठकही पार पडली. मात्र, या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. शिर्डीतील अनेक राजकीय पक्षांनी साई मंदिरात फुले आणि हार नेण्यावर बंदी कायम ठेवण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. या बरोबरच येथे येणाऱ्या भाविकांची फसवणूक होत असून त्यांची आर्थिक लूटही केली जाते असे सांगत येथील ग्रामस्थांनीही बंदीचे समर्थनच केलेले होते.

धर्मांतर प्रकरणातील आरोपीची दहशत; अल्पवयीन मुलीचा मानसिक छळ
मात्र, फुलांची शेती करणारे शतकरी, आणि विक्रेते यांचे कुटुंब या व्यवसायावर चालत असल्याने शेतकरी आणि विक्रेते चिंतेत आहे. तसेच फुले विक्रेत्यांनी आंदोलनाचा मार्ग पत्करल्याने आता या प्रश्नावर तोडगा काढणे महत्वाचे झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here