जिल्हाधिकाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढून त्यावर योग्य पद्धतीनं अंत्यसंस्कार करण्याचा आदेश दिला. मंगळवारी डिंडोरीतील बिरसामुंडा स्टेडियमजवळील घरात रुक्मिणी यांनी अखेरचा श्वास घेतला. रुक्मिणी गेल्या १० वर्षांपासून सिकल सेल ऍनिमिया आजाराचा सामना करत होत्या. ओंकारदास आणि रुक्मिणी यांना अपत्य नाही. रुक्मिणी यांच्या निधनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक आणि शेजारी जमले. पत्नीला घरातच दफन करा, असं मोगरेंनी त्यांना सांगितलं. नातेवाईक, शेजारींनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र मोगरेंनी कोणाचच ऐकलं नाही. पत्नीशिवाय आपण राहू शकत नाही, असं मोगरे म्हणाले.
मोगरे कोणाचच ऐकत नसल्यानं नातेवाईकांनी घरातच खड्डा खणला आणि त्यात रुक्मिणी यांचा मृतदेह पुरला. मोगरे यांच्या निर्णयामुळे शेजारी धास्तावले. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. मात्र कोणतीच कारवाई झाली नाही. जिल्हा प्रशासनाचं एक पथक मोगरे यांच्या घरी पोहोचले. मात्र मोगरेंनी त्यांना विरोध केला. मनुष्य आणि आत्मा यांना आपण समान मानतो. त्यामुळे पत्नीचं शरीर आपल्यापासून दूर नेण्याची गरज नसल्याची भूमिका मोगरेंनी घेतली. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं. त्यानंतर रुक्मिणी यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.
husband buried wife, आपण मरेपर्यंत सोबत राहू! पत्नीचा मृतदेह शिक्षक पतीनं घरातच पुरला अन् मग… – mp teacher buries wife at home and slept near grave in dindori
दिंडोरी: मध्य प्रदेशच्या डिंडोरी जिल्ह्यातील एका शिक्षकाच्या पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीच्या निधनामुळे पतीवर मोठा आघात झाला. पत्नी आपल्यापासून दूर जाईल ही कल्पनाच त्याला सहन होईना. नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या विरोधानंतरही त्यानं पत्नीचा मृतदेह घरात पुरला.