पूर्णिया: बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील स्मशान घाट परिसरातून ५ मृतदेह चोरीला गेले आहेत. नौलखा येथे दफनभूमीत पुरण्यात आलेले ५ मृतदेह चोरीला गेल्यानं परिसरात खळबळ माजली आहे. याआधी २०१४ मध्ये याच स्मशान घाट परिसरातून ७ मृतदेह चोरीला गेले होते. त्या प्रकरणाचा उलगडा अद्याप झालेला नाही. अंतिम संस्कारासाठी पैसे नसलेली बहुतांश कुटुंब या ठिकाणी मृतदेह दफन करतात.

स्थानिक गुराखी स्मशान घाटात गेले असताना त्यांना मृतदेहांची चोरी झाल्याचं लक्षात आलं. पाच कबरींमधील माती काढण्यात आली असून तिथले मृतदेह गायब झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या ठिकाणी महादलित समुदायाच्या लोकांचं मृतदेह दफन केले जात असल्याचं हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राम कुमार महतो यांनी सांगितलं.
सरकारी अभियंता कुबेर निघाला; कोट्यवधींचं घबाड हाती, नोटांची बंडलं सापडली, दागिने जप्त
स्मशान घाट परिसरातून एकाएकी पाच मृतदेह चोरीला गेल्यानं स्थानिकांमध्ये आक्रोश आहे. घरांत चोऱ्या होत असताना आता मृतदेहदेखील चोरीला जात असल्यानं स्थानिक संतापले आहेत. गरिबीमुळे मृतदेहांना अग्नी देण्याऐवजी ते दफन केले जातात. मात्र दफन केलेले मृतदेहदेखील चोरीला जातात. त्यामुळे स्मशानाच्या भोवती सुरक्षा भिंत उभारण्यात यावी, अशी मागमी स्थानिकांनी केली आहे.
भयंकर! रेल्वेतील नोकरीसाठी जुगाड; पण सॅनिटायझर फवारताच पितळ उघडं पडलं
तंत्रमंत्रांसाठी मृतदेहांची चोरी केली जात असावी असा संशय ग्रामस्थांना आहे. मृतदेहांची तस्करी केली जात असावी. ते वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पाठवले जात असावेत, अशीही शक्यता काही ग्रामस्थांनी बोलून दाखवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here