रत्नागिरी: राज्याचे विरोधी पक्षनेते हे देखील वादळग्रस्त कोकणचा दौरा करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद यांनी फडणवीसांच्या या संभाव्य दौऱ्याचं स्वागत केलं आहे. ‘ते कोकणात येणार असतील तर चांगलंच आहे. त्यांच्या ज्ञानात भर पडेल,’ अशी कोपरखळी पवारांनी लगावली आहे. (Sharad Pawar taunts )

वाचा:

रत्नागिरी जिल्ह्यातील गावांमध्ये वादळामुळं झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व अन्य नेत्यांनी नुकताच कोकणाच्या वादळग्रस्त भागांचा दौरा केला. त्यानंतर आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते फडणवीसही कोकणात जाणार असल्याचं सांगितलं जातं. त्याबद्दल विचारलं असता पवार यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली. ‘कोकणात किती नुकसान झालं आहे हे सर्वांना कळलं पाहिजे. प्रत्येक जण वेगळ्या भागांतून येतो. मी बारामतीच्या दुष्काळी भागातला आहे. ते नागपुरातले आहेत. समुद्राचा आणि नागपूरचा काही संबंध नाही. त्यामुळं सगळ्यांच्या ज्ञानात भर पडेल. आमच्याही पडते आहे. त्यांच्याही ज्ञानात भर पडेल ही चांगली गोष्ट आहे,’ असं पवार म्हणाले.

राज्यपालांचं ज्ञान ऑक्सफर्डपेक्षाही अधिक असेल!

विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत राज्यपाल ठाम आहेत. त्यांनी तसं पत्रही मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलं आहे. त्याबद्दलही पवारांनी आपलं मत मांडलं. ‘मी शिक्षण क्षेत्रातील जाणकार नाही. महाविद्यालयात असतानाही मी काही हुशार विद्यार्थी नव्हतो. पण राज्यात करोनाच्या साथीची भयंकर परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत परीक्षा घेता येतील का याबद्दल काही जाणकारांशी चर्चा केली. काही गोष्टी माझ्या वाचनात आल्या. त्यानुसार देशातील महत्त्वाच्या शिक्षणसंस्था असलेल्या दिल्ली, मुंबई, कानपूर, खरगपूर येथील आयआयटींनी देखील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आयआयटीच्या प्रमुखांचं ज्ञान आपल्यापेक्षा अधिक असेल. देशाच्या बाहरेही असे निर्णय घेतले गेले आहेत. जगातील सर्वोत्तम विद्यापीठ असलेल्या ऑक्सफर्डनंही असाच निर्णय घेतला आहे. ऑक्सफर्डच्या कुलगुरूंपेक्षाही आपल्या आदरणीय राज्यपालांचं ज्ञान अधिक असू शकतं. ते वयस्कर आहेत. त्यामुळं त्यांच्या निर्णयाचा देखील आपण आदर केला पाहिजे,’ असं पवार म्हणाले.

वाचा:

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here